
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३२७९ वा दिवस
प्रेम, धर्म आणि पवित्रता ही आपल्या स्वतःच्या हृदयात जितकी वृद्धिंगत होईल तितके आपल्याला बाहेरील जगतात प्रेम, धर्म नी पवित्रता दिसू लागेल आपण दुसऱ्यांची निंदा करतो त्याने वस्तुतः आपण स्वतःच निंदिले जात असतो. जे तुमच्या हाती आहेत ते पिंडजगत वा अंतर्जगत तुम्ही नीट ठेवा म्हणजे ब्रम्हांड वा बहिर्जगतही तुमच्या पक्षी आपोआप व्यवस्थित, नीट होऊन जाईल. हे त्या जलस्तितिशास्त्रातील विरोधाभासारखे Hydrostatic paradox सारखे आहे. पाण्याचा एक बिंदू अवघ्या विश्वाला समतोल अवस्थेत ठेवू शकतो. आपल्या आत मध्ये जे नाही, ते आपल्याला बाहेर दिसणे शक्य नाही. जगात जी काही खरीखुरी प्रगती झाली आहे ती सारी प्रेमाच्या शक्तीनेच झाली आहे दोष दाखवीत बसल्याने कधी कोणाचेही कल्याण झाले नाही. निंदेने, तिरस्काराने काहीही उपयोग होत नाही. हजारो वर्षे हे करून बघण्यात आले आहे. हजारो वर्षाच्या अनुभवान्ती हे सिद्ध झाले आहे. निंदण्याने काहीही साध्य होत नाही. जो खराखुरा वेदांती आहे त्याच्या ठायी अगदी सगळ्यांविषयी सहानुभूती वसत असते. कारण अद्वैत वा संपूर्ण एकत्व हा तर मुळे वेदांताचा आत्माच आहे. अभिन्नताच वेदांताचे सार आहे.
स्वामी विवेकानंद...
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर जेष्ठ /शुक्रमास २ शके १९४८
★ जेष्ठ अधिक शुध्द /शुक्ल ८
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ शनिवार दि. २३ मे २०२६
★ १९८४ एव्हरेस्ट शिखर चढून जाणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मान बचेंद्री पाल या महिलेला मिळाला.
★ आंतरराष्ट्रीय कुर्मदिन (कासव दिन)
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
