
नाशिक (प्रतिनिधी) – अभिषेकी स्वर परंपरेची अभिजात शैली आणि त्याच्या जोडीला प्रयोगशीलता व तरल स्वर यांचा मिलाफ रसिकांनी अनुभवला आणि एका वैभवशाली मैफलीची अनुभूती घेतली.500 हून अधिक रसिकांनी तुडुंब गर्दीत ही स्वर पर्वणी अनुभवली.रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात हे ब्रीद घेऊन 50 व्या सुवर्ण महोत्सवी पुष्पात सुर विश्वास मैफिलीने पदार्पण केले अनेक नव्या-जुन्या कलाकारांना शास्त्रीय गायनाचे हक्काचे व्यासपीठ देणार्या या मैफीलीचे 50 वे पुष्प. नव्या पिढीतील प्रतिभाशाली शास्त्रीय गायक अभेद रश्मी शौनक अभिषेकी यांनी गुंफले सुवर्ण महोत्सवी मैफल

विश्वास गार्डन, गंगापूर रोड, नाशिक येथे संपन्न झाली रसिक कुलकर्णी (तबला) ईश्वरी दसककर (संवादिनी)जागृती नागरे (तानपुरा.) ज्ञानेश्वरी बागुल(तानपुरा) यांनी साथसंगत केली . सुत्रसंचालन डॉ.स्मिता मालपुरे यांनी केले.अभेद ने मैफीलीची सुरुवातनट भैरव ने केली राग विलंबित एकताल “गुंज रही” व धृत तीनताल “जब तक फिरे सूरज चंदा”, दोन्ही रचना पंडित सी.आर. व्यास यांच्या होत्या.त्यानंतरशुद्ध सरंग मध्ये मध्यालय तीनताल मध्ये “मोरा रे पिहरवा” ही पंडित रत्नकांत रामनाथकर यांची बंदिश आणि पंडित रामश्रय झा यांचा चतुरंग सादर केला.शब्दातून स्वरांचे जोरकसपण,सजगपण सहज शैलीत सादर केले.भैरवी मध्ये पंडित दिनकर कैकिणी यांचा तराणा सादर केला. यावेळी बोलताना विश्वास ग्रुप चे कुटुंब प्रमुख विश्वास लीलावती जयदेव ठाकूर म्हणाले की,नाशिकचे सांस्कृतिक संचित जपण्याचे आणि जपवणूक करण्याचे संस्कृती संवर्धक म्हणून काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे कुठल्याही शहराची सांस्कृतिक उंची अभिरुची संपन्न मनावर अवलंबून असते तेच शहराचे वैभव असते.सुर विश्वास चे संकल्पक विनायक रानडे म्हणाले की,शास्त्रीय संगीत ऐकणाऱ्या कानसेन ,कलाकारांना आपलेसे करणारे हे व्यासपीठ अल्पावधीत लोकाभिमुख झाले आहे याचा आनंद आहे.यावेळी कलाकारांचा सन्मान मंजिरी असनारे केळकर, पं शंकरराव वैरागकर,पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांचे हस्ते करण्यात आले.रश्मी शौनक अभिषेकी यांचा सन्मान आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड यांचे हस्ते करण्यात आला.मैफिलीसाठी प्रायोजकत्व देणारे रवींद्र डेव्हलपर्स चे रवींद्र पाटील यांचा सन्मान डॉ मनोज शिंपी यांनी केला.तसेच सुर विश्वास मैफिलीत गायन ,वादन करणारे कलाकारांचा सन्मान सन्मानपत्र देऊन करण्यात आला.त्यात शंकरराव वैरागकरयांचा सन्मान विश्वास ठाकूर,डॉ उद्धव आष्टूरकर यांचा सन्मान विनायक रानडे, आर्या गायकवाड चा सन्मान डॉ अविराज तायडे,ओमकार कडवे चा सन्मान डॉ सुधीर संकलेचा,रचना गाडगे यांचा सन्मान पं सुभाष दसककर,डॉ आशिष रानडे यांचा सन्मान सी एल कुलकर्णी यांनी डॉ स्मिता मालपुरे यांचा सन्मान अभेद अभिषेकी यांनी केला.तसेच उद्योजक संदीप शहाणे यांचा सन्मान विलास हावरे यांनी केला सदर कार्यक्रमास विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा जलालपूर, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च फाऊंडेशन, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, विश्वास टर्फ, ग्रंथ तुमच्या दारी यांचे सहकार्य लाभले ..
