शासकीय माध्यमिक आश्रम शाळा शिरसगाव येथे संपंन झाला स्नेहमेळावा

शिरसगव ता.१८ (वार्ताहर)शासकीय माध्यमिक आश्रम शाळा शिरसगाव येथे १९९३-९४ या शैक्षणिक वर्षातील इयता सातवीच्या वर्गातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच संपन्न झाला. आदिवासी क्रांतिकारक धरती आबा बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन व अभंग गायनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त अधीक्षक के.डी.पारे व शासकीय माध्यमिक आश्रम शाळा पिंपरखेड येथील प्राथमिक मुख्याध्यापक आर.के. चौधरी हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शासकीय माध्यमिक आश्रम शाळा शिरसगाव येथील अधीक्षक अरुण बागले यांनी भूषविले.तर शाळेचे मुख्याध्यापक दिपक भास्कर, शिरसगावचे पोलीस पाटील शंकर महाले,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अरुण महाले, शिरसगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच भगवान महाले,माजी विद्यार्थी ज्ञानेश्वर महाले,दिलीप भोये यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लाभली. विविध क्षेत्रातील माजी विद्यार्थ्यानी एकत्र येऊन शाळेच्या प्रती व्यक्त केलेली कृतज्ञता ही भविष्यातील प्रगतीचे द्योतक आहे.माजी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात नावलौकिक संपादन करीत या शाळेचे नाव उज्ज्वल केले अशी प्रतिक्रिया याप्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केली. भविष्यात असेच अनेक माजी विद्यार्थी मेळावे व्हावेत अशीही अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. याप्रसंगी शिरसगाव आश्रम शाळेतील सन २०२४ -२५ या वर्षातील राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धत १७ वर्ष वयोगट आतील १५०० ते ३००० मीटर धावणे स्पर्धेत सुवर्णपदक व राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त खेळाडू सानिका चौधरी, १४ वर्ष वयोगट आतील २०० मिटर धावणे स्पर्धेत रौप्यपदक व राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त खेळाडू लता ढोले हिना टोपले, १७ वर्ष वयोगटा आतील सांघिक स्पर्धेत ४ x४०० रीले स्पर्धेत रौप्यपदक प्राप्त खेळाडू हिना टोपले,सारिका महाले,सानिका चौधरी,मयुरी लहारे,मोहिनी लहारे यांचा माजी विद्यार्थ्यांकडून सत्कार करण्यात आला.तसेच शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात नैपुण्य मिळवून शाळेचे नाव उंचावणाऱ्या गुणवंत,होतकरू विद्यार्थ्यांसाठी आठ हजार रुपये रोख रक्कम माजी विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक दिपक भास्कर व अरुण बागले यांचेकडे सुपूर्द केली. यावेळी पांडूरंग महाले,गणपत कोंगील,जयराम गाढवे, किसन बेंडकोळी, वसंत राऊत, भगवान महाले, हरिदास राऊतमाळे, अनिल महाले, रमेश पखाने, शांताराम चौधरी, गोपाळ साठे, कैलास महाले, प्रकाश ढोले, संजय घुनघुणे, इंदुमती महाले, तारा महाले, हिरा मौळे हे विविध क्षेत्रातील माजी विद्यार्थी तब्बल ३२ वर्षांनी एकत्र येत शाळेविषयी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैलास महाले यांनी केले,सूत्रसंचालन भगवान महाले यांनी केले. तर वसंत राऊत यांनी उपस्थितांचे आभार मानले.याप्रसंगी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
