
निफाड (प्रतिनिधी ) माणुसकी फाऊंडेशन, निफाड या संस्थेच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा शनिवार दिनांक १७ मे २०२५ रोजी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आमदार छगनराव भुजबळ यांच्या शुभहस्ते समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी निफाड विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.शिवाजीराव ढेपले , निफाड नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष मा.अनिल पा.कुंदे , माणुसकी फाऊंडेशन चे अध्यक्ष सागर निकाळे ,रयत शिक्षण संस्थेचे विभागीय चेअरमन डॉ.सुजीत गुंजाळ , श्री माणकेश्वर वाचनालयाचे अध्यक्ष मा.मधुकर शेलार आदि मान्यवर उपस्थित होते.निफाड येथील लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात हा सन्मान सोहळा संपन्न झाला .यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचा योग आला.त्यानिमित्ताने थोर समाजसुधारक व स्री शिक्षणाचे आद्य प्रणेते महात्मा जोतीराव फुले यांच्यावर लिहिलेली कविता सादर केली…उपस्थितांनी प्रचंड टाळ्यांचा गजर करीत कवितेला दिलेली दाद आनंद देणारी प्रतिक्रिया ठरली….कार्यक्रमासाठी दिगंबर वडघुले , सुहास सुरळीकर राहुल सोनवणे, ज्ञानेश्वर सांगळे आदिंनी परिश्रम घेतले.
