
नाशिक:-( प्रतिनिधी )ज्येष्ठांचा मानसन्मान ही आपली संस्कृती आहे. बिकट होत चाललेल्या परिस्थितीत कुटुंबव्यवस्था ढासळत असताना खऱ्या अर्थाने विचार आणि संस्कारांची गरज आजच्या पिढीला आहे, असे प्रतिपादन पुस्तकांची आई भीमाबाई जोंधळे यांनी केले. गिरणा गौरव प्रतिष्ठान संचलित महाराष्ट्र राज्य गिरजा महिला मंचच्या वतीने हुतात्मा स्मारकात मातृदिनानिमित्त जिल्ह्यातील आदर्श मातांच्या सन्मान सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाध्यक्ष साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण जोशी, हुतात्मा स्मारक समितीचे सदस्य विजय राऊत, गिरजा महिला मंचच्या राष्ट्रीय अध्यक्षा प्रतिभा म्हस्के, जिल्हाध्यक्ष शितल कुयटे, उपाध्यक्ष भाग्यश्री चौधरी आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. भीमाबाई जोंधळे पुढे म्हणाल्या की, समाजातील पिढीला आदर्श देण्यासाठी आई-वडील यांनीही मुलांकडे लक्ष दिले पाहिजे. एक पुस्तक हजारो मस्तके घडवत असते. त्यासाठी आपण पुस्तके वाचली पाहिजेत, असा संदेशही त्यांनी दिला.

कार्यक्रमाध्यक्ष प्रवीण जोशी, विजय राऊत, शितल कुयटे यांनी मनोगत व्यक्त केले.प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सरला जगन्नाथ चव्हाण (येवला), संगीता गुंजाळ (निफाड), सविता संतोष चव्हाण (चांदवड), अलका सुरेश निकम (मालेगाव), भीमाबाई शिंदे (दिंडोरी), सुशीला बाबूलाल महाजन (कळवण), सुमित्रा रामदास राऊत (त्र्यंबकेश्वर), गंगाबाई सखाराम थवील (सुरगाणा), जिजाबाई दोधा मोरे (सटाणा), चित्राताई शेवाळे (देवळा), मंदा वसंतराव अत्रे (नांदगाव), मथुरा रामभाऊ वारुंगसे (इगतपुरी), वीरमाता भारती भालेराव (नाशिक), काशीबाई तुकाराम भरसट (पेठ), प्रभावती विश्वनाथ भावसार (सिन्नर), वीरमाता बबूबाई ढाकणे (तळेगाव दिंडोरी), वीरमाता कृष्णाबाई बोडके (नाशिक) या आदर्श मातांचा सन्मान करण्यात आला. भाग्यश्री चौधरी प्रास्ताविक केले. कांचनमाला हुजरे यांनी सूत्रसंचालन तर माधुरी भावनाथ यांनी आभार मानले. शितल चव्हाण, पूजा दंडगव्हाळ, अलका दराडे, वैशाली सोनवणे, हर्षाली भोसले, आशा गोवर्धने, वंदना गांगुर्डे, सविता दरेकर, सुशीला संकलेचा, माधुरी अमृतकर, रूपाली पवार यांसह गिरजा महिला मंचच्या सदस्या आणि सन्मानार्थी मातांच्या कुटुंबातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. *काव्यवाचन स्पर्धेत संध्यारजनी सावकार प्रथम* पहिल्या सत्रात ‘काळजातील आई’ या विषयावर संपन्न झालेल्या काव्यवाचन स्पर्धेत राज्यभरातील ४५ कवयित्रींनी सहभाग घेतला. प्रथम-संध्यारजनी सावकार, द्वितीय-कालिंदी वाणी (ठाकुर्ली,डोंबिवली), तृतीय-सुशीला संकलेचा, उत्तेजनार्थ-अर्चना परदेशी या पारितोषिकप्राप्त स्पर्धकांना रोख पारितोषिके प्रदान करण्यात आली. ज्येष्ठ साहित्यिका अलका दराडे यांनी परीक्षण केले. कवयित्री आशा गोवर्धने यांनी सूत्रसंचालन तर माधुरी अमृतकर यांनी आभार मानले.
