
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९१० वा दिवस* आपण मिळविलेले विमलज्ञान या क्षणभंगूर आयुष्यात निस्वार्थीपणाने, सेवाभावनेने समाजाला सतत देत राहावे, निरपेक्ष प्रेम हेच त्या चित्तशक्तीला आवडते. चंदनाने झिजावे लागते, नदीने आणि वाऱ्याने वाहावे लागते, वृक्ष आपल्या डोईवर सूर्याचे प्रखर किरण झेलतो आणि अश्रितांना आनंद देतो. आपल्यात जमलेले पाणी मेघ साऱ्या सजीव सृष्टीला देत सुटतात. अविश्रांत श्रम हे क्षुद्र विषयांचे पारिपत्य करतात. त्यामुळे सतत वाटत रहावे, इतरांना देत रहावे. विस्तार म्हणजे जीवन आणि आकुंचन म्हणजे मृत्यू.*”Expansion is life, Contraction is death”
स्वामी विवेकानंद…
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर २८ वैशाख शके १९४७
★ वैशाख वद्य /कृष्ण ६
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ रविवार दि. १८ मे २०२५
★ १४९८ पोर्तुगीज खलाशी वास्को – द – गामा भारताच्या कालीकत बंदरात दाखल झाला.
★ १८४६ मराठी भाषेतील आद्य पत्रकार, “दर्पणकार” आचार्य बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर यांचा स्मृतीदिन
★ १९७४ भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या उपस्थितीत पोखरण येथे आण्विक अस्त्राची पहिली यशस्वी चाचणी झाली
.★ जागतिक संग्राहलय दिन.
