
नवनाथ गायकर ( प्रतिनिधी ) राजकारणात बरीचशी माणसं बापजादयाचं बोट धरुन येतात, वारसा चालवतात. बरीचशी माणसं धनाच्या बळावर येतात.अशी आलेली माणसं केवळ समाजहिताच्या गप्पा मारत असली तरी यांचे राजकारण स्वत;ला खुर्ची मिळावी.घन आधिकाधिक वाढावे या पलिकडे नसते. पण अपवादात्मक माणसं असतात जी कसलाही वारसा नसतानां, धन नसतानां, एका सामान्य कुटुंबात जन्माला येऊनही स्वकर्तृत्वाने आभाळाला गवसणी घालतात.नुसतं स्वकर्तृत्नच नाही उजळवत तर पदावर असो, नसो, सातत्याने विकासगंगा आणतात, आणि भल्या भल्यानां जे जमत नाही ती अचाट कामे करुन दाखवतात.यी मांदियाळीत *गोरख बोडके* हे नाव दिमाखाने , अभिमानाने घ्यावे लागेल. नकाशावर ही नसलेले गाव, तिन्ही बाजुनीं डोंगर व अतिमागास असलेले *मोडाळे* हे बोडकेचें गाव.शिक्षणाची सोय नाही.उदरनिर्वाहाचे साधन नाही. म्हणुन गोरख भाऊला लहानपणीच गाव सोडावे लागले, आणि कामगार म्हणुन गोंदे दुमाला औदयौगीक वसाहतीत काम धरावे लागले.पण तिथेही मालकाचीं मुजोरी, कामगाराचें शोषण याचा तीव्र फटका बसुन गोरख भाऊवर बेरोजगार होण्याची वेळ आली.हाच त्यांच्या जीवनातला टर्निंग प्वॉईंट ठरला.

मुळात स्वभाव धाडसी, चळनळया व आक्रमक.नेतृत्व गुण तर पहिल्यापासुनच होते. या तुनच मग कामगार नेता बोडकेचां उदय झाला.आपल्या आक्रमक शैलीतुन त्यांनी कामगारानां न्याय मिळवुन दिला. त्यांच्या या कामामुळे ते लोकप्रिय होत गेले.तरुणाईला हे नेतृत्व भावले. यानंतर त्यांनी राजकारणात उडी घेतली आणि शिरसाटे जि.प. गटातुन त्यांनी आश्चर्यकारक विजय मिळवला. या निवडणुकीत त्यांनी दिग्गजानां मात दिली.जातीय वादाची भिंत तोडुन टाकली. हया पाच वर्षाच्या काळात गोरख भाऊनीं मागे पाहिले नाही. हाकेला ओ दयायचा त्यांचा स्वभाव.कुणाचे ही काम असो, आणि कसलेही काम असो. सातत्याने पायाला भिंगरी बांधुन गोरख भाऊची भ्रमंती सुरुच. *कै.लोकनेते गोपाळराव गुळवे* यांचे नंतर असे नेतृत्व तालुक्याला प्रथमच मिळाले. जि.प.सदस्य एका गटाचे असतानांही गोरख भाऊनी तालुकाच आपले कार्यक्षेत्र मानले.संपुर्ण तालुकाभरात कार्यकर्त्याचें जाळे उभे केले.आणि त्या माध्यमातुन अनेकानेक कामे केली. जि.प.निवडणुकीत पुढील वेळेस सुरगाणा तालुक्यात जाऊन तिथल्या राजघराण्याच्या सोनाली राजे पवाराचां पराभव करुन जायंट किलर बनले. राजकारणाच्या माध्यमातुन जनहिताची कामे करत असतानांच स्वत;च्या माय भु चे पांग फेडण्यासाठी गोरख भाऊनी अक्षरश; जीवाचे रान केले.गावाचा चौफेर विकास करत हे गाव रोल मॉडेल बनवले. राष्ट्रपती पारितोषिकाने हे गाव सन्मानित झाले आहे.पंतप्रधान नरेंद मोदीनीं या गावाची दखल घेतली आहे.राज्यपालानीं या गावास भेट देऊन कौतुक केले आहे. उपेक्षित असलेले हे गाव गोरख भाऊने एवढया उंचीवर नेऊन ठेवले आहे कि असे आदर्श, विकासाभिमुख गाव आज तालुक्यात काय, जिल्हयात सापडणार नाही. दुर्दैवाने ईगतपुरी-त्रंबकेश्वर विधानसभा मतदार संघ हा अनुसुचित जमातीसाठी राखीव असल्याने आमदार होण्यास कै. गुळवे प्रमाणेच गोरख भाऊनां मर्यादा पडली आहे.अन्यथा अशी धडाडीची माणसं आमदार, खासदार व मॉत्रीपदाच्या पात्रतेची आहे. खपंतर अजुनही लिहिण्यासारखे खुप काही आहे. असो, जन्मदिनानिमित्ताने गोरख भाऊनां खुप खुप हार्दिक शुभेच्छा. आई तुळजाभवानी त्यांना उदंड आयु आरोग्य देओ ही सदिच्छा.——*लेखन**नवनाथ अर्जुन पा. गायकर*
