
आजरा ( प्रतिनिधी ) येथील आजरा तर्फ शिपूर गावचे सुपुत्र, ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक आणि माजी प्राचार्य डाॅ. सुरेश कुराडे यांना आसावरी जीवनगौरव पुरस्कार २०२५ जाहिर झाला आहे. त्यांच्या साहित्यिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन कोसमाक, महाराष्र्ट व आसावरी प्रकाशन मुंबई यांच्या संयुक्त संमेलनात पुरस्कार वितरण होणार आहे. डाॅ. सुरेश कुराडे यांचे “स्टॅण्डर्ड गुलाम” व “कॅनव्हास” कवितेचा हे दोन काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. वंचित, उपेक्षित आणि मागासलेल्यांचे प्रश्न, समस्या त्यांच्या लेखनाचे विषय आहेत. त्यांनीअनेक प्रातिनिधिक, दैनिक, त्रैमासिक, दिवाळी अंकातून कविता, कथा लेखन केले आहे. तसेच त्यांना अनेक संस्थांचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. गेली ४० वर्षे विविध प्रकारचे ते लेखन करीत आहेत. संस्थापक, अक्षर सिंधु साहित्य कलामंच सिंधुदुर्ग, संस्थापक सम्यक साहित्य संस्था महाराष्ट्र, संस्थापक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य, सांस्कृतिक विचारमंच महाराष्ट्र, विश्वस्त, कोकण मराठी साहित्य कविकट्टा, मार्गदर्शक स्वाभिमानी वाचनालय इंगळी, मार्गदर्शक न्यू अथर्व प्रकाशन, रुई ; संस्थापक, समता प्रतिष्ठान महाराष्ट्र, उपसंपादक, दिशा महाराष्ट्राची इत्यादी सन्मान ते भूषवित आहेत. तर ४थे शिक्षक साहित्य संमेलन सावंतवाडी, २००४. ११ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन, हुपरी,२०२२ तर १ले राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन, इचलकरंजी २०२४ इत्यादी संमेलनात त्यांनी संमेलनाध्यक्ष म्हणून पद भूषविले आहे. त्यांच्या एकूणच कार्याची दखल घेत मुक्काम महाळुंगे ता. राजापूर येथे होणार्या आसावरी साहित्य संमेलनात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने यथोचित सन्मान करण्यात येणार आहे.
