
नाशिक (प्रतिनिधी) : मुलांनी फक्त छंद म्हणून संगीत क्षेत्राकडे न पाहता करिअर,साधना म्हणून पहावे.संगीतात गुरूचे स्थान कालातीत आहे त्याचा आदर करावा व शिष्याने विनम्रता जोपासावी.आजच्या वेगाने बदलणाऱ्या सोशल मीडियाच्या जगात मनाला उभारी ,आनंद देणारी मूलभूत कला संगीत आहे,ती जोपासण्यासाठी मेहनत,कष्ट यांची तयारी ठेवावी तोच यशस्वी तेचा मार्ग आहे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध.तबला वादक पं.नितीन वारे यांनी केले.कुमार’ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी ‘सूरविश्वास कुमारमंच’चे अकरावे पुष्प विश्वास बँक डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास बँकेसमोर, स्वातंत्र्यवीर सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे संपन्न झाले त्यावेळी मार्गदर्शन करताना नितीन वारे बोलत होते.कार्यक्रमाची सुरुवात स्वरांगण अकादमी चा विद्यार्थी शुभम इंगळे च्या हार्मोनियम वादनाने झाली, त्याने राग यमन मध्ये रूपक तालात गत सादर केली आणि त्या नंतर दृत तीनतालात एक गत सादर केली, त्यांना तबला साथ . संगीत कुलकर्णी ह्यांनी केलीत्यानंतर धनश्री सिमंत ह्यांनी राग भीमपलास मध्ये जा जा रे अपने मंदिरवा ही पारंपारिक बंदिश सादर केली , त्यांना तबला साथ श्री. संगीत कुलकर्णी ह्यांनी व हार्मोनियम साथ अभिजित भाटजिरे ह्यांनी केली.कार्यक्रमाची सांगता स्वरांगण संगीत अकादमी च्या मुलांच्या समूह तबला वादनाने झाली, त्यांनी तीनतालात एक कायदा, एक रेला व काही रचना सादर केल्या , त्यांना लेहरा संगत श्री. अभिजित भाटजिरे ह्यांनी केलीसमुह तबला वादनात श्रवण चंद्रात्रे, श्रीधर म्हस्के, ओमकार इंगळे, वेदांत धायडे, वेदांत शिंदे, निकुंज पाटील, वेदांत गडाख, अन्वय पाटील, शर्वरी गोळेसर, तेजय तायडे हे सहभागी झाले . सागर कुलकर्णी व संगीत कुलकर्णी या गुरूंच्या मार्गदर्शनाने ही मैफल संपन्न झाली . सूत्रसंचलन विनया देशपांडे यांनी केले..या कार्यक्रमाचे ‘आयोजक विश्वास लिलावती जयदेव ठाकूर, ऋचिता ज्योती विश्वास ठाकूर, संकल्पक विनायक आशा पुरूषोत्तम रानडे आहेत सदर कार्यक्रमास विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा जलालपूर, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च फाऊंडेशन, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, विश्वास टर्फ, ग्रंथ तुमच्या दारी यांचे सहकार्य लाभले .
