
सिन्नर ( प्रतिनिधी ) राष्ट्रीय एकात्मता साधत छत्रपती संभाजी चौकात सर्व जाती धर्मातील गुणवंत एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. सिन्नर शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक तसेच काजीपुरा परिसरातील शोषित,पीडित,वंचित,दुर्लक्षित, कष्टकरी,शेतकरी,झोपडपट्टी भागातील एस.एस.सी.गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार महामित्र परिवाराच्या वतीने येथील संभाजी चौकात संपन्न झाला.

छत्रपती संभाजी महाराजांच्या 368 व्या जयंतीचे औचित्य साधत विद्येची देवता क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले व आद्यशिक्षिका फातिमा शेख यांच्या प्रतिमेस गुणवंत विद्यार्थिनींनी पुष्पमालेने मानवंदना देऊन क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, फातिमा शेख, महात्मा फुले, यांचा जय जयकार केला. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे बहुजन समाज सर्व क्षेत्रात प्रगतीपथावर आहे, राष्ट्रीय एकात्मता याची आज देशाला अत्यंत गरज आहे आणि आजचा सत्कार सोहळा हा आदर्शव्रत असा आहे. संयोजकांनी कार्यक्रम पत्रिकेत आणि बॅनरवर सावित्रीमाई फुले आणि फातिमा शेख यांच्या समवेत कर्नल सोफिया कुरेशीआणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांची छायाचित्रे लावून समाजापुढे एकात्मतेचा संदेश दिला.* *कार्यक्रमाचे प्रास्ताविक जमिर सैय्यद सर यांनी केले, सूत्रसंचालन स्वप्निल वायचळे यांनी केले तर आभार प्रदर्शन संतोष कुरणे मानले.* *कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महामित्र दत्ता वायचळे होते. विचार मंचावर ज्येष्ठ शिक्षक जे.आर. गीते सर, जेष्ठ* *सामाजिक कार्यकर्ते हाजी गुलाबभाई सैय्यद, प्रकाश भाटजिरे, कॉम्रेड हरिभाऊ तांबे,*भाऊसाहेब पवार, सुनिल कुऱ्हे सर,पी.एल. गोळेसर, युवा उद्योजक उदय गोळेसर, बांधकाम व्यावसायिक योगानंद गवळी, परिवहन महामंडळाचे देवाभाऊ सांगळे,किरण गवळी, दिपक भाटजिरे आदी उपस्थित होते.सुनिल कुऱ्हे सर यांनी विद्यार्थ्यांना विविध* *क्षेत्रातील करिअर संबंधितल्या संधीबद्दल माहिती देऊन त्या पद्धतीने अभ्यास करून यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी* *सोडविण्यासाठी सदैव तत्पर असल्याचे आश्वासन दिले. कॉम्रेड हरिभाऊ तांबे यांनी अधिकारी होऊन सर्वसामान्यांसाठी निस्वार्थ सेवा करण्याचे आवाहन केले. युवा उद्योजक उदय गोळेसर यांनी मुलींचे शिक्षणातील उत्तीर्णतेचे प्रमाण जास्त असल्याने विशेष आनंद होत असल्याचे सांगितले आणि मुलींच्या शिक्षणासाठी, गणवेषासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. सौ.रोहिणी कुरणे यांनी मुलींच्या शैक्षणिक विकासामध्ये पालकांचा मोलाचा वाटा असल्याचे सांगून विद्यार्थिनींनी विशेष नैपुण्य मिळवल्याबद्दल कौतुक केले. श्री.भाऊसाहेब पवार यांनी धोंडविनगर सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थी अक्षय विलास पवार खडतर परिश्रम घेऊन जिल्हाधिकारी* *पदापर्यंत*पोहोचल्याचे उदाहरण दिले.* *एस.टी. कर्मचाऱ्यांचे नेते श्री. देवाभाऊ सांगळे यांनी** *विद्यार्थ्यांच्या घरात शैक्षणिक वातावरण नसताना मिळवलेल्या यशाचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. गुणगौरव समारंभाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे यांनी दहावीच्या टक्केवारीची हवा डोक्यात जाऊ न देता आणि मोबाईलचा आवश्यक तेवढाच वापर करून सावित्रीमाई फुले आणि प्रतिमा शेख यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून निवडलेल्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेण्याचे आवाहन केले. सोबतच पितृछत्र हरवलेल्या आणि अतिशय प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेऊन* *बारावी विज्ञान शाखेत तालुक्यात प्रथम आलेल्या सानिया इम्रान खतीब या विद्यार्थ्यांनीेचे विशेष कौतुक केले. याप्रसंगी खालील दहावीतील गुणवंत विद्यार्थी कु. जुल्फीन जमिर सैय्यद,कु. अनन्या गणेश मुटके,कु.ऋतुराज किरण भाटजिरे,कु.भूमी संतोष कुरणे,कु.अक्षदा राजेंद्र गोळेसर,कु.आर्या विलास भाटजिरे,कु. स्वदेश दत्तात्रय मुंढे,कु.साक्षी रामदास करडग,कु.प्रणव योगानंद गवळी,कु.वेदिका उज्ज्वल भाटजिरे,कु.मल्हार मंगेश गोळेसर,कु.यशराज मच्छिंद्र वायचळे,कु.सानिया इम्रान खतीब यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी रामदास करडग,भरत जगताप, वसीम खतिब,श्री.योगेश मुटके,श्री. रमेश भाटजिरे, श्री.साहिल शेख, श्री.गणेश मुटके, श्री.विलास भाटजिरे, मच्छिंद्र वायचळे,कु.आभिषा वायचळे, सौ.दुर्गा मुटके, रोहिणी भाटजिरे, सौ.शितल करडग, अनिता वायचळे, इंदुबाई कुरणे, जयश्री भाटजिरे, चैताली कुरणे, हौशाबाई कुरणे, सौ.परवीन सैय्यद, सोनाली मुटके, सौ.कांचन मुटके, सौ.रजिया सैय्यद, प्रमोद मुटके, अक्षय कुरणे, सुरेश कुरणे, दत्तात्रय मुंढे, प्रवीण भाटजिरे,धनंजय(नाना) जाधव,अभिषेक वायचळे, हनुमान गोळेसर, रामा गोळेसर, महेंद्र सांगळे, दीपक मुंडे, संतोष उगले, सुरेश हुडे, रामा जगताप, विकी शिंदे, आकाश पोपळघट,श्याम मिठे,शौकतभाई सैय्यद. सर्वांना मिठाई भरून आणि शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
