
सिन्नर ( प्रतिनिधी )प्रतिकूल परिस्थितीतही उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या कुमारी स्नेहलचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा- कृष्णाजी भगत साहेब वडिलांचे छत्र हरपलेले असताना अत्यंत साधारण आर्थिक परिस्थितीतही कुमारी स्नेहल बाजीराव शिंदे या विद्यार्थिनीने एसएससी परीक्षेत 97 टक्के गुण मिळवून विद्यालयात तसेच सोनांबे केंद्रात प्रथम क्रमांक मिळवला. कुमारी स्नेहलचे हे यश अभिमानास्पद असून विद्यार्थ्यांनी कुमारी स्नेहल चा आदर्श घ्यावा असे प्रतिपादन मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सिन्नर तालुका संचालक आदरणीय कृष्णाजी भगत साहेब यांनी केले ते सोनांबे विद्यालयात व सोनांबे केंद्रात एसएससी परीक्षेत 97 टक्के गुण मिळवून प्रथम आलेल्या कुमारी स्नेहल बाजीराव शिंदे हिच्या सत्कार प्रसंगी बोलत होते विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रभाकर फटांगळे, शिक्षक नवनाथ माळी, सुहास जुन्नरे, भारती धाकतोडे, सोनाली देशमुख,भाऊसाहेब दहिफळे आदी यावेळी उपस्थित होते. कुमारी स्नेहल हिला लहानपणी पितृ सुखाला पारखे व्हावे लागले आज तिची मोठी बहीण कुमारी शितल ही सुद्धा चार्टर्ड अकाउंटंटची परीक्षा देत आहे. आई श्रीमती संगीता हरसुले येथील प्राथमिक शाळेत झाडू मारणे, पोषण आहार शिजवणे अशी कामे करून मुलींना शिकवत आहे अशा प्रतिकूल परिस्थितीत कुमारी स्नेहलणे एसएससी परीक्षेत गौरवास्पद यश मिळवलेले आहे असेही ते पुढे म्हणाले. अशा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मराठा विद्या प्रसारक समाज संस्था नेहमीच पुढाकार घेत असते त्यामुळे कुमारी स्नेहल व शीतल यांचे भविष्य उज्वल असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले मुख्याध्यापक प्रभाकर फटांगळे यांनी प्रास्ताविक केले सोनाली देशमुख यांनी आभार मानले
