
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९०९ वा दिवस
बहुतत्त्वांमध्ये एकत्व हा प्रकृतीचा नियम आहे. त्या व्यावहारिक जगतात असंख्य भेद आहेत, परंतु त्या समस्त भेदांमध्ये अनंत अपरिवर्तनशील निरपेक्ष एकत्व विद्यमान आहे. प्रत्येक व्यक्ती संबंधी असेच म्हणता येईल. कारण व्यक्ती म्हणजे समष्टीचीच छोटीशी आवृत्ती होय. व्यक्ती व्यक्तींमध्ये कितीही भिन्नता असली तरी देखील त्या समस्त भिन्नतेत चिरंतर समन्वय, अखंड एकत्व विराजत आहे. आपल्याला हेच ओळखायचे आहे, आपल्या चित्तावर, मनावर बिंबवून घ्यावयाचे आहे. एकत्व हे जगातील सर्वोच्च तत्व आहे. *स्वामी विवेकानंद… *●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर २७ वैशाख शके १९४७*
★ वैशाख वद्य /कृष्ण ५
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शनिवार दि. १७ मे २०२५
★ संत चोखामेळा पुण्यतिथी, मंगळवेढा
★ १८६५ सुलतानशाही पासून ब्रिटिश अमदानीपर्यंतचा महाराष्ट्राचा इतिहास लिहीणारे इतिहासकार रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांचा जन्मदिन.
★ जागतिक दूरसंचार दिन
★ जागतिक उच्च रक्तदाब दिन
★ जागतिक माहिती संस्था दिन.
