
नाशिक ( प्रतिनिधी) राज्यातील 14 पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या प्रतीचे आदेश आज सायंकाळी सहसचिव वेंकटेश भट यांनी काढले त्यामध्ये नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांची बढती होऊन त्यांची मुंबई येथे अप्पर आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्र पोलीस अकादमीत सहाय्यक संचालक म्हणून अरविंद साळवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे मात्र नाशिक ग्रामीण च्या पोलीस अधीक्षक पदी अद्याप कोणाचीही नियुक्ती झालेली नाही ती एक दोन दिवसात होण्याची शक्यता आहे देशमाने यांनी आपल्या कार्यकाळात नाशिक ग्रामीण मध्ये अवैद्य धंद्याविरुद्ध मोठी मोहीम सुरू केली होती.
