
सिन्नर( प्रतिनिधी):- येथील लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयात माजी विद्यार्थी सेवा संस्था यांच्या सहकार्याने सोमवार दिनांक १९ मे रोजी सकाळी १० वाजता माजी विद्यार्थी सभागृहाचे भूमिपूजन समारंभ कार्यक्रम नाशिक जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार राजाभाऊ वाजे व राज्याचे कृषिमंत्री नामदार अँडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या शुभहस्ते होणार आहे अशी माहिती मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक कृष्णाजी भगत व विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब देशमुख यांनी दिली आहे. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस अँडव्होकेट नितीन ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न होणार आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले ,उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, सभापती बाळासाहेब क्षिरसागर, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी ,माजी जिल्हा परिषद सदस्या सीमांतिनी कोकाटे, सिन्नर स्टाईसचे चेअरमन नामकर्ण आवारे ,निमाचे अध्यक्ष बबनराव वाजे आदिंसह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमामुळे शाळा व माजी विद्यार्थ्यांमधील संबंध अधिक घट्ट करणारा एक प्रेरणादायी टप्पा आहे. शाळेत होणाऱ्या विविध कार्यक्रमासाठी सभागृह उपलब्ध होणार असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. कार्यक्रमास संस्थेचे सभासद ,हितचिंतक,पालक व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आव्हान संस्थेचे संचालक कृष्णाजी भगत, मुख्याध्यापक बाळासाहेब देशमुख , माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष व कार्यकारणी सदस्य, शालेय समितीचे सदस्य,सेवानिवृत्त शिक्षक,शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे .
