
रेणुका उगले हिने ९४.८०
चांदवड (प्रतिनिधी) – श्री नेमिनाथ जैन माध्यमिक विद्यालयाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल यंदा ९५.५० टक्के लागला असून, या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये रेणुका उगले हिने ९४.८० टक्के गुण मिळवत शाळेत चौथा क्रमांक पटकावला आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.रेणुका हिच्या या यशामागे तिची आई सौ.कविता उगले मा.नगराध्यक्ष आणि वडील श्री. संदीप उगले (शिवसेना शहरप्रमुख, चांदवड) यांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा लाभली. मेहनत, सातत्य आणि आत्मविश्वास यामुळेच तिने हे यश मिळवले, असे मत शिक्षकांनी व्यक्त केले.रेणुकाच्या या यशाबद्दल संपूर्ण उगले कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळी तसेच चांदवड शिवसेना परिवाराकडून तिचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. भविष्यात ती आणखी यश संपादन करेल, अशी शुभेच्छा देण्यात येत आहे💐💐💐🩷👍🏼
