
.ओझर दि.१६( वार्ताहर) राष्ट्रीय किटकजण्य रोग नियंत्रण कार्यक्रम जिल्हा नाशिक व जिल्हा आरोग्य अधिकारी नासिक, जिल्हा हिवताप अधिकारी नासिक, व तालुका आरोग्य अधिकारी निफाड यांच्या नियोजननुसार प्राथमिक आरोग्य केंद्र ओझर अंतर्गत ओझर व दीक्षी येथे राष्ट्रीय डेंग्यूदिन 16 मे रोजी साजरा करण्यात आला. त्यानुसार चालू वर्षीचे घोषवाक्य “**तपासा, आणि झाकून ठेवा :डेंग्यूला हरविण्याचे उपाय करा* “या घोषवाक्य नुसार ओझर गावात, सोनेवाडी, दात्याने, जिव्हाळे, थेरगाव, दीक्षी येथे गावातील जेष्ठ नागरिक, आशा, आरोग्य कर्मचारी, सुपरवायजर, सर्वांनी एकत्र येत रॅली काढली. गावात गप्पी मासे सोडून राष्ट्रीय डेंग्यू दिनाचे महत्व प्रा आ के ओझरचे मलेरिया सुपरवायजर रवींद्र देवरे नाना यांनी सांगितले. त्याचबरोबर वैद्यकीय अधिकारी डॉ आनंद सुर्वे, डॉ प्राची पवार, आरोग्य सहयिका भारती कदम, प्रयोगशाळा वैद्यनिक अधिकारी पल्लवी कुलकर्णी, फार्मसी ऑफिसर सुमती ठाकूर, समुदाय आरोग्य अधिकारी प्रतिभा जुनागडे, आपला दवाखानाचे वैद्यकीय अधिकारी रिद्धी पाटील, कावेरी कदम, संगीता गाडे, आरोग्य सेविका बागुल मनीषा, दीपिका भामरे, करिष्मा काकड सिस्टर, प्रतिभा चौधरी, कारले सिस्टर, स्नेहल पवार, दवणे सिस्टर, नंदा देवरे, वंदना तिरहलकर सिस्टर, आरोग्य सेवक सतीश गारोळे, प्रवीण राऊत, प्रशांत बिहाडे, मोतीराम थोरे, जयवंत राऊत, कमलेश पवार,आपला दवाखाना चे उमेश रामटेके, समीर मुरुडेश्वर, विकास पीठे, अविनाश घोडविंदे तसेच सविता ढवळे, भारती लिलके, स्वाती पवार, मेघा वाघ, मनीषा निर्भवणे, निर्मला जाधव, उन्हवणेताई, चित्रा सुतार, पूनम गांगुर्डे, सुनीता तोंगारे, प्रा आ के स्वाती सिस्टर, सोनाली सोनवणे सिस्टर, सुवर्णा सिस्टर, स्वाती चंदणशीव सिस्टर, लभडे सिस्टर , मोरे दीपाली क्षयरोग टेक्निशियन, प्रशिक्षक बागुल HLL लॅबचे कर्मचारी यांनी प्रभातफेरी काढून *किमान आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळला पाहिजे. प्रत्येक घरी गप्पी मासे सोडण्याचा संकल्प कर्मचाऱ्यांनी घेतला*.जागतिक डेंग्यू दिन सामुदायिक शपथ घेऊन भागात कुठेही डेंग्यू रुग्ण होऊ न देण्याचा संकल्प केला. पाण्याच्या टाक्यांवर झाकणे ठेवा, पाणी उघड्यावर ठेऊ नका अशी माहिती रॅलीत देण्यात आली. रॅलीसाठी सर्व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, अंगणवाडी सेविका, नगर परिषद कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
