
.ओझर(प्रतिनिधी ) नाशिकच्या ओझर येथे ऑल इंडिया संविधान आर्मी राज्यस्तरीय बैठक दिनांक 15 मे 2025 रोजी दुपारी दोन वाजता ऑल इंडिया संविधान आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्राची मुलुख मैदानी तोफ संविधान बचाव चळवळीचे प्रणेते, कामगार नेते आंदोलन पुरुष जगनभाऊ सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

तसेच यावेळी संविधान आर्मीचे संविधान रक्षक सैनिक, देशभक्त नाशिक जिल्हा कमिटी तर्फे जगनभाऊ सोनवणे यांचे संविधानाची प्रत व तिरंगा ध्वज भेट देऊन फेटा बांधून स्वागत करण्यात आले. संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाल्याने संविधान वाऱ्याने तर्फे संविधान तिरंगा गौरव यांनी काढण्यात आली. संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक रित्या वाचन करण्यात आले. तसेच संविधान पूजन, तिरंगा पूजन आणि संविधान निर्माते यांचे पूजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे राष्ट्रगीत सामूहिक रित्या गाऊन कार्यक्रमाचे समापन करण्यात आले. राज्यस्तरीय बैठक प्रचंड यशस्वी करून महाराष्ट्र राज्यातील सर्व कार्यकर्त्यांची भोजनाची व्यवस्था व नियोजन संविधान आर्मी नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष संविधान रक्षक सैनिक देशभक्त शशिकांतभाऊ शार्दुल यांनी केले. यावेळी राज्यभरातील व नाशिक जिल्ह्यातील सर्व नूतन कार्यकर्त्यांना नियुक्तीपत्र देऊन स्वागत करण्यात आले. नाशिक जिल्हा संविधान आर्मी कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष अशोकदादा उगले तसेच राज्यातील विविध 10 संघटनांचे पदाधिकारी यावेळी बैठकीस उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संविधान आर्मी जिल्हा उपाध्यक्ष संविधान रक्षक सैनिक देशभक्त कांचन राव जाधव ओझर यांनी केले. यावेळी संविधान आर्मी ओझर शहराध्यक्ष दिवाकर जाधव व सर्व संविधान रक्षक सैनिक महिलावर्ग यांनी बैठक यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी मुक्ताराम बागुल नांदगाव (नाशिक)
