
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९०८ वा दिवस कोणत्याही समस्येची सोडवणूक जातीय, राष्ट्रीय वा अन्य कोणत्याही संकुचित भूमिकेवरून कधीही होणार नाही. हेही प्रतिदिनी अधिकाधिक स्पष्ट होत आहे. प्रत्येक कल्पना, प्रत्येक आकांक्षा सर्व जगाला सामावून घेईल एवढी व्यापक व विशाल होणे आवश्यक आहे. ती अखिल मानव जातीलाच नव्हे तर सजीव सृष्टीला देखील व्यापून टाकेल. आपल्याला या अधोगतीचे एक कारण असे आढळून येईल की आपली दृष्टी व आपल्या कार्याचे क्षेत्र हे दोन्हीही दिवसेंदिवस संकुचित झाले आहे.
*स्वामी विवेकानंद…
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*
★ भारतीय सौर २६ वैशाख शके १९४७*★ वैशाख वद्य /कृष्ण ४
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शुक्रवार दि. १६ मे २०२५
★ संकष्टी चतुर्थी
★ १६६५ पुरंदर किल्ला लढविताना मराठेशाहीतील स्वामीनिष्ठ सरदार मुरारबाजी देशपांडे यांचे प्राणार्पण स्मृतीदिन.
★ १९३१: भारतीय राजकारणी व माजी परराष्ट्रमंत्री के. नटवर सिंह यांचा जन्मदिन.
★ जागतिक कृषि पर्यटन दिन.*संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक*
