
नाशिक (प्रतिनिधी )दि. १४ मे २०२५ रोजी पंचवटीतील नांदूर नाका येथे छत्रपती संभाजी रोडवरील ‘हॉटेल द शिवार’ येथे शिवस्वराज्य युवा प्रतिष्ठान संघटनेचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी भव्य प्रवेश सोहळा तसेच छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्मोत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला.संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पोपट आत्माराम पताडे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक स्वागत केले. या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण राष्ट्रीय शिवव्याख्याते उद्धव शेरे पाटील आणि हरिभक्त परायण संदीप महाराज जाधव यांची प्रेरणादायी उपस्थिती ठरली. कार्यक्रमात कायदेशीर सल्लागार ॲड. गुलाब शेटे यांचाही विशेष सहभाग होता.

याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष रवी मराठी, महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा नीलम ताई पवार, प्रदेश संघटक विक्रम कदम, प्रदेश संपर्कप्रमुख अण्णासाहेब पाटील, कायदेशीर सल्लागार ॲड. विजय महाले, महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा विमलताई काजळे, महिला आघाडी प्रदेश संपर्कप्रमुख शिवमती खोपकर, महिला आघाडी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा प्रीतीताई विचारे, मराठवाडा अध्यक्ष ज्योतीराम पवार, नाशिक जिल्हाध्यक्ष अंकुश गुंजाळ, मुस्लिम आघाडी नाशिक जिल्हाध्यक्ष जुबेर शेख आणि महिला आघाडी नाशिक जिल्हा अध्यक्षा वनिताताई सोनवणे महाराष्ट्र राज्य सोशल मीडिया अध्यक्ष श्री भागवत झाल्टे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.या भव्य* *सोहळ्याचे आयोजन नाशिक जिल्हा शहर पदाधिकारी यांनी नेटकेपणाने पार पाडले. जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांची आणि सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती हा या कार्यक्रमाचा वैशिष्ट्यपूर्ण भाग ठरला.शिवस्वराज्य युवा प्रतिष्ठान संघटनेच्या माध्यमातून युवकांमध्ये राष्ट्रभक्ती, छत्रपतींचे विचार, आणि समाजसेवेचा संदेश पोहोचवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व स्तरातून आयोजकांचे कौतुक होत शिवस्वराज्य युवा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष पोपट पाटील पताडे यांच्या हस्ते संघटनेमध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे. व कार्यक्रम मोठ्या उत्सवात पार पाडला
