
नाशिक रोड-( प्रतिनिधी )दरवर्षी मे महिन्यात ब्राह्मण सभा नाशिक रोड सामुदायिक मौंजी कार्यक्रम आयोजित करते. सामुदायिक मौंजी ची तयारी जानेवारी महिन्यापासून सुरू होते. मे महिन्यात शाळेला सुट्टी असल्यामुळे सामुदायिक मौंजीबंधनास चांगला प्रतिसाद मिळतो. वणी, इंदोर, नासिक, नासिक रोड या ठिकाणाहून आलेल्या १३ मुलांच्या मौंजी संपन्न झाल्यात. श्री निलेश मुळे गुरुजी व त्यांच्या चमुने पौरोहित्य केले.सर्व कुटुंबीयांनी मातृभोजनाचा आनंद घेतला. श्री विवेक दंडवते गुरुजी, अध्यक्ष, श्री गणेश महाराज देवस्थान, नाशिक यांनी मौंजी केल्यावर बटोंनी रोज गायत्री मंत्र उपासना व संध्या करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले.

दत्ता कुळकर्णी, सचिव यांनी प्रास्ताविक केले, मुकुंद कुळकर्णी, अध्यक्ष यांनी सिंहस्थापुर्वी ४ मजले बांधकाम करायचे असल्याने दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन केले.सामुदायिक मौंजीबंधनानिम्मित देणगीदार अनिल कुळकर्णी, समिती प्रमुख सुरेश कुळकर्णी, रास्वलकर वकील, उदय धर्माधिकारी, विवेक दंडवते, माजी आमदार निशीगंधा मोगल, राजाभाऊ मोगल, निलेश मुळे गुरुजी, संजय दीक्षित, गिरीश तांबे, राजेंद्र गोरवाडकर यांचे सत्कार केले.

सामुदायिक मुंज कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदाकिनी शेरीकर, शुभदा देशपांडे, मंजुषा ताथोडे, अविनाश गोसावी, मकरंद एकतारे, मिलिंद ताथोडे, शोभना व्यवहारे, के. पी. कुलकर्णी, अनिल कुलकर्णी, उदय धर्माधिकारी, सुरेश कुलकर्णी, दत्ता कुलकर्णी, किरण हिंगणे, राजीव व्यवहारे यांनी विशेष परिश्रम घेतले. मार्गदर्शन श्री मुकुंद कुलकर्णी यांचे लाभले. वऱ्हाडी मंडळींनी सुरुची जेवणाचा आस्वाद घेतला. जेवणाची जबाबदारी किरण हिंगणे यांनी चोख बजावली. त्यानंतर सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.वृत्त संपर्क- सुरेश कुळकर्णी,98905 76528
