
दोंडाईचा-(प्रतिनिधी) येथे गाव परिसरात अतिक्रमण-बेकायदेशीर बांधकाम जेव्हाही काढले गेले असले, तेव्हा ते अतिक्रमण-बेकायदेशीर बांधकाम बाबत व डबल न्यायाबाबत लोकांची ओरड निघणार नाही,असे कधीही घडलेले नाही आहे.म्हणजे येथे अतिक्रमण-बेकायदेशीर बांधकाम बाबत गरिबाला वेगळा न्याय व श्रीमंतांना वेगळा न्याय दिला जात असल्याचे अनेकवेळा लोकांनी प्रशासन स्तरावरील अधिकारी व न्याय देणाऱ्या यंत्रणांना अनेक दाखले देऊन सत्यता पटवून दिली आहे.तर आताच्या राजपथ रस्त्यावरील,मागील ७८ दुकानदारांची न्याय मिळवण्यासाठी वणवण भटकंती चालू आहे.

आज अतिक्रमण-बेकायदेशीर बांधकाम बाबत विषय मांडायला कारण असे की,नुकतेच दोंडाईचा नगरपालीका प्रशासकीय यंत्रणेने स्टेशन भागातील भाजीपाला मंडीमधील काही बेकायदेशीर पत्र्यांचे बांधकाम असलेल्या टपऱ्या जेसीबी लावून क्षणात काढल्या,म्हणजे ह्या टपऱ्या काही क्षणात त्या ठिकाणी आल्या नव्हत्या किंवा महिने सहा महिने अगोदरही आल्या नव्हत्या.तर ह्या टपऱ्या त्याठिकाणी अनेक वर्षांपासून अस्तित्वात होत्या व त्यावर आपल्या कुटूंबाचे उदरनिर्वाह चालवत होते.म्हणजे इतक्या वर्षात त्या टपऱ्या कोणाला नडल्या नाहीत.पण ह्या वर्षीच का काढल्या गेल्या तर,ते टपरीधारक हे गरिब-तुटपु़ंज्या भांडवलावर उदरनिर्वाह करणारे होते किंवा त्यांचा कोणी वाली मोठा नेता/लाल दिवाधारक नव्हता,अशी लोकाभिमुख माहीती समोर येत आहे.तर दुसरीकडे गावात विविध ठिकाणी,राजपथ रस्तांसह अनेक श्रीमंतांचे डोलारे बेकायदेशीर डोलत आहे.तेथे मात्र कोणाची हिंमत होत नाही.तेथे मलाईदार एजंटासाठी मलाईदार रसमलाई मिळते.म्हणून ते काढले जात नाही.आता भाजीपाला मंडी अर्थात मानराज हाॅटेल मागील बनणाऱ्या रस्त्यावर पहा किती कलगीतुरा रंगला व निष्पन्न काय झाले(राजपथ रस्त्याबाबतही अशीच परिस्थिती आहे).तर आपले लोक कोण व गरिब लोक कोण,असे म्हणत रस्ता व गटारीला वळण देण्यात आले आहे,असे लोक उघड तोंडानी म्हणत आहे.म्हणून गावात नेहमी अतिक्रमण-बेकायदेशीर बांधकाम व डबल न्यायाबाबत लोकांची ओरड निघत असते.
