
सिन्नर ( प्रतिनिधी) मुसळगावात खऱ्या अर्थाने सर्वच क्षेत्रात चांगल्या दिशेने परिवर्तन होत आहे, त्यातील एक उदाहरण आमचे मुसळगाव येथील राजु पाटील जाधव आणि गवारे कुटुंबाने एक आदर्श समाजासमोर ठेवला आहे, मध्यंतरी कै.कांताबाई गवारे या माऊशींचे निधन आणि दशक्रिया विधी (जलदान) या निमित्ताने राजु पाटील जाधव आणि संपूर्ण गवारे कुटुंबाने सर्व आप्तेष्ट, नातेवाईक आणि मित्र परिवार यांना विनंती केली की टाॅवेल, शाल ,टोपी ऐवजी प्राथमिक शाळेतील गरीब मुलांना मदत होईल अशा प्रकारे आपण आर्थिक सहाय्य करावे आणि खरोखरच राजु पाटील जाधव आणि गवारे कुटुंबाच्या चांगल्या कामास सर्वांनी साथ दिली, छोट्याशा दानपेटीत रुपये २३१०/- काल सकाळी प्राथमिक शाळा मुसळगांवच्या मुख्याध्यापिका श्रीमती भालेराव मॅडम आणि उपशिक्षक कासार सर यांच्या हातात ती दानरुपी पेटी देण्यात, याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष संतोष कदम, ग्रामपंचायत सदस्य राजु पाटील जाधव, स्कुल कमिटीचै अध्यक्ष विजय शिंदे, विद्यमान सोसायटी संचालक कोंडाजी थोरात आणि सोसायटीचे मा.संचालक ज्ञानेश्वर शिंदे उपस्थित होते, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापिका भालेराव मॅडम आणि उपशिक्षक कासार सर यांनी या चांगली संकल्पना राबविली या बद्दल राजु पाटील जाधव यांचे आणि उपस्थिंताचे आभार मानले

