
*मनमाड (प्रतिनिधी) दि १४ मे रोजी हिमालयाएवढे शौर्य असलेले महापराक्रमी, स्वराज्यरक्षक, धर्मरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मोत्सवा निमित्त आमदार सुहास(आण्णा) कांदे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या मनमाड शहरातील छ संभाजी महाराज नगर येथील धर्मवीर संभाजीराजे स्मारकाला रायगड किल्ल्यावरून आणलेल्या पाण्याने व दुधाने अभिषेक पूजा मनमाड शिवसेना शहर प्रमुख मयूर बोरसे व शिवसेना विधानसभा संघटक जाफर मिर्झा यांच्या हस्ते करून पुष्पहार अर्पण शिवसेना जिल्हा संघटक नाना शिंदे, माजी नगराध्यक्ष बबलूभाऊ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले,

तसेच सर्व शिवभक्त शिवप्रेमींनी एकमेकांना मोतीचूर लाडूंनी तोंड गोड करून शुभेच्छा दिल्या.**तसेच जय जिजाऊ, जय शिवराय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, जय भवानी- जय शिवाजी, जय शिवाजी-जय भवानी जयघोष करण्यात आले.**प्रमुख उपस्थिती म्हणून भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नितीनजी पांडे, वाल्मिक आप्पा आंधळे, सुभाष माळवतकर, अनंता भामरे, कचरू आव्हाड, आशिष घुगे, विजय परदेशी, विक्की घुगे, मयूर माळी, महाराष्ट्र नगरपालिका कामगार विकास सेना अध्यक्ष किशोर अहिरे, कार्यअध्यक्ष जाँनी जाँर्ज, सचिव तुषार बोराडे, उपाध्यक्ष भारत वाघ, प्रसिद्धीप्रमुख किरण कवडे, कार्यकारणी सदस्य निखिल करोसिया, उमेश चुनियन, निलेश कमोदकर, संदीप आव्हाड, विशाल डुंगरवाल, सुमेर मिश्रा, सर्वेश जोशी, मंगेश महाले, सोनू गरुड, अशोक कनोजे, शिवसेना महिला आघाडी उपतालुका प्रमुख सौ नाजमा जाफर मिर्झा, सौ अनिता इप्पर, सौ संगीता उगले, सौ शहनाज मिर्झा, सौ अनुराधा पाराशर आदी शिवभक्त शिवप्रेमी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते**कार्यक्रमाचे आयोजन मंगेश पगार, परेश राऊत, आशिष पाराशर, निलेश परदेशी आदींनी केले*
