
नाशिक ( प्रतिनिधी )दि. १४ मे : आज दिनांक १४ मे रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंतीनिमित्त हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याच्या हेतूने मराठा सेवा संघ, वीर भगत सिंह विद्यार्थी परिषद, लाख मराठा प्रतिष्ठान आणि डी. एस. एफ. फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकच्या रामशेज किल्ला येथे बीज उधळण या भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

. छत्रपती संभाजी महाराज यांचे राज्याभिषेकाला ३५१ वर्षे झाले आहेत. या निमित्त्ताने ३५,१०० सीड बॉल तयार करण्यात आले होते. यामध्ये बाभूळ, चिंच, विलायती चिंच, करवंदे, मोह, सिताफळ, रामफळ, हीवर, बोर, करंजी, शिरस या झाडांच्या बीया यांचा समावेश होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५१ वर्षे पूर्ण झाले आहेत. याचा उत्साह साजरा करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने हा उपक्रम राबवण्यात आला. या सर्व सीड बॉलची उधळण आज दिनांक १४ मे रोजी नाशिकच्या सुप्रसिद्ध रामशेज किल्ला या परिसरात करण्यात आली. सकाळी ७.३० वाजता या कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.

. या कार्यक्रमासाठी आशेवाडीचे सरपंच संतोष मळेकर, मराठा महासंचाचे अध्यक्ष चंद्रकांत बनकर, सकल मराठा संस्थेचे नाना बच्छाव ,मराठा सेवा संघाचे दीपक भदाणे, संभाजी ब्रिगेडचे प्रफुल वाघ, सागर मुथा, कवी राजेंद्र सोमवंशी, सौ. विजया दुधारे आदी मान्यवरांच्या हस्ते पूजन करून सुरवात करण्यात आली. यानंतर जमलेल्या सर्वांनी रामशेज किल्याच्या विविध भागात नेवून ३५,१०० सीड बॉलची उधळण केली. या कार्यक्रमासाठी विविध क्रीडा संघटना, क्रीडा संस्था, विविध शाळा, अश्वमेघ अकॅडेमी, परिसरातील नागरिक यांचा यामध्ये समावेश होता.यावेळी मराठा महासंचाचे अध्यक्ष चंद्रकांत बनकर, जेष्ठ कवी ताठ क्रीडा संघटक व सुप्रसिद्ध कवी राजेंद्र सोमवंशी, कवयित्री सौ. विजया दुधारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याचा गौरव केला. या कार्यक्रमाचे प्रस्तिविक आणि माहिती अशोक दुधारे यांनी दिली. सूत्रसंचालन अविनाश वाघ यांनी तर आभार अशोक कदम यांनी मानले.
