
सोनांबे ( प्रतिनिधी) सोनांबे विद्यालयाचा एस एस सी परीक्षेचा निकाल ९७.८१ टक्के समाधानकारक असून विद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन शालेय समिती अध्यक्ष नंदू पाटील पवार यांनी केले ते सोनांबे विद्यालयात एस एस सी परीक्षेतील गुंणवंतांच्या सत्कार प्रसंगी बोलत होते. माजी पंचायत समिती सदस्य सोपान काका पवार, शालेय समिती सदस्य गुरुवर्य बी एम पवार सर, कचरू शिंदे, सखाहरी शिंदे,, भाऊसाहेब विठ्ठल पवार, गोवर्धन पतसंस्थेचे संचालक भाऊसाहेब पवार, सुदाम पवार, पालक संघाचे अध्यक्ष नितीन पवार, कचरू पाटील पवार, नाना शिंदे, बाबुराव शिंदे, संदीप शिंदे, संगीता शिंदे, वनिता शिंदे आदी मंचावर उपस्थित होते.विद्यालयात प्रथम क्रमांक मिळवून उत्तीर्ण झालेली कु स्नेहल शिंदे, द्वितीय प्रज्वल पवार, तृतीय शिवराज शिंदे, चतुर्थ कु प्रणाली पवार, पंचम गायत्री शिंदे या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रभाकर फटांगळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले योगिता शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले सोपान पवार यांनी आभार मानले यावेळी ज्येष्ठ शिक्षक शांताराम चांदोरे, पंडित चिने, जनाबाई सुडके, भारती धाकतोडे, रुपावली काळे, नवनाथ माळी, किरण पवार, मीना केदार, सुहास जुन्नरे, रुपाली महाले, सोनाली देशमुख, राजेंद्र पालवे, सुनील पवार आदी उपस्थित होते.
