
नाशिक ( प्रतिनिधी )-रेडीओ विश्वास ९०.८ आणि स्मार्ट, संस्था दिल्ली तर्फे हिंसा को नो हा उपक्रम मागील दोन वर्षांपासून चार वसाहतींमध्ये चालू आहे, सदर उपक्रम एकूण १०० महिलांसोबत राबविला जात आहे, या ग्रुप च्या महिलांसाठी १ दिवसीय सहलीचे आयोजन रेडीओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडीओ च्या माध्यमातून करण्यात आले. मागील दोन वर्षांपासून चालू असलेल्या या उपक्रमाचे यश म्हणजे महिलांच्या विचारसरणी मध्ये अमुलाग्र बदल घडून आलेला दिसतो, महिलांच्या आत्मविश्वासामध्ये वाढ झालेली आहे, एखाद्या अत्याचारित महिलेने कधी कोणत्या ठिकाणी मदत मागायला जायचे याची सुद्धा माहिती आता महिलांना झालेली आहे, त्यांच्या तिच्यात झालेला हा बदल साजरा करण्याच्या हेतूने आणि महत्वाचे म्हणजे वर्षभरातील सर्व सण समारंभ मोठ्या उत्साहात या महिलांसोबत साजरे केले जातात, मात्र ३१ मार्च ला रमजान ईद साजरी करता आली नाही, कारण महिलांना एकत्रित आणणे शक्य नव्हते, सहलीच्या निमित्ताने सर्व महिला एकत्रित आल्या आणि रेडीओ विश्वास तर्फे १०० महिलांसाठी निसर्गरम्य वातावरणात एक दिवसीय सहलीचे आयोजन केले. रमजान ईद च्या निमित्ताने रौफ पटेल यांनी १०० महिलांसाठी जेवणाची व्यवस्था करून देवून सहकार्य केले, इतकेच नाही तर फ्रावर्शी इंटरनॅशनल स्कूल ने महिलांच्या जाण्या-येण्यासाठी चे साधन उपलब्ध करून देवून विशेष सहकार्य केले आणि विशेष म्हणजे या सहलीमध्ये विश्वास ग्रुप चे कुटुंब प्रमुख विश्वास ठाकूर यांचे मोलाचे मार्गदर्शन महिलांना लाभले. या सहलीसाठी माळी गल्ली, अण्णाभाऊ साठे नगर, वडाळा गांव, कस्तुरबा नगर, भारत नगर येथून महिला सहभागी झाल्या, स्त्री हि सृष्टीची शक्ती आहे, कारण संपूर्ण मानवजातीचे अस्तित्व तिच्या पासून च सुरु होते, मात्र आजही तिच्या संरक्षणासाठी आणि सक्षमीकरणासाठी काम करावे लागते हे आपले दुर्देव म्हणावे लागेल, स्त्रिया सुद्धा पुरुषांप्रमाणेच त्यांच्या प्रत्येक आकांक्षा पूर्ण करू शकतात, त्यांच्यामध्ये ती शक्ती असते ज्यातून ती तिच्या जीवनाशी संबंधित प्रत्येक निर्णय स्वतः घेऊ शकते आणि कुटुंब आणि समाजात चांगले आयुष्य जगू शकते, आणि याची सिद्धी महिलांना व्हावी म्हणून वेगवगे ळे खेळ त्याठिकाणी खेळण्यात आले, महिलांनी कविता केल्या, गाणी गायली, मोठ्या उत्साहात महिला आनंद लुटताना दिसून आल्या. सर्व महिलांनी स्वतःला एक दिवसासाठी बंधनातून मुक्त केले, रेन डान्स चा मनमुराद आनंद घेतला खेळ खेळल्या, निसर्गाच्या सानिध्यात मोकळा वेळ घालवला, सर्व महिलांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली, त्या म्हणाल्या आमच्या आयुष्यातील अविस्मिरणीय असा हा दिवस आहे, आम्हाला माहेरी आल्या सारखे वाटते आहे. सदर कार्यक्रमाचे आयोजन रेडिओ विश्वास चे स्टेशन डायरेक्टर कुलकर्णी व समन्वयक रुचिता ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी छाया साबळे, ज्ञानेश्वर सिरसाठ, सागर नागरे, अलका शेळके श्रद्धा कराळे, सचिन हांडे, देविका गोसावी आणि ममता जाधव आदींनी परिश्रम घेतले.
