
नांदगाव ( प्रतिनिधी )नमन एज्युकेशन सोसायटी संचलित लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांचा १००% निकाल जाहिर.. परिश्रम केल्यानंतर यश मिळते. यश मिळाल्यावर आनंद मिळतो. परिश्रम तर सगळेच करतात.. परंतु यश हे त्यानाच मिळते.जे कठोर परिश्रम करतात..स्कूलची यंदा २०२४ -२५ यावर्षी प्रथम दहावीची बॅच असल्याने मा.मॅनेजमेन्टने स्वतः स्कूलमध्ये सर्व विद्यार्थ्यांची लेखी तीन सराव परीक्षा घेऊन योग्य नियोजन व व्यवस्थापन केले.सर्व विषय शिक्षक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वर्षभर सतत मार्गदर्शन व परिश्रम घेतले.मास्टर हिरे भावेश -८४% प्रथम ,मास्टर पगारे प्रेम -७६.८०% द्वितीय ,मास्टर इंगोले वेदांत ७४.६०% तृतीय क्रमांक ,मास्टर शॉन गोयकर -७१.८०% , मास्टर बागूल साहिल -७०.२०% ,मीस अन्सारी लीजा – ६६.८०% उत्तीर्ण विद्यार्थी आले.या यशवंत विद्यार्थ्यांसाठी स्कूलचे अध्यक्ष श्री.संजय बागूल,उपाध्यक्ष सौ. सरिता बागूल ,विषय शिक्षक श्री.संदीप पांडे ,श्री.राहुल उपाध्ये ,श्री.मोहन सुरसे ,विषय शिक्षिका श्रीमती -अनिता जगधने ,श्रीमती -मेघा शिरसाट व स्कूलचे कर्मचारी यांनी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक करून अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या..
