


नाशिक रोड (प्रतिनिधी) दि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट,नाशिक संचलित *यशोदामाता डायाभाई बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्युनि. कॉलेज च्या २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १० वी बोर्डाच्या परीक्षेमध्ये उत्तुंग यश संपादन केले आहे.**शाळेचा निकाल १००.% प्रथम तीन क्रमांक खालीलप्रमाणे….प्रथम कु. तृप्ती राजेंद्र पाटील ( ९६.६०) द्वितीय कु. प्रणाली सचिन वायकंडे (९४.४०)तृतीय कु. श्रेया सतीष गांगुर्डे ( ९२.४० )यासाठी वाय.डी.बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापिका सौ कुशारे सविता मॅडम , उपमुख्याध्यापक श्री.मिलिंद कोठावदे, श्री.परशराम पुंड ,पर्यवेक्षक श्री राजेंद्र सोमवंशी तसेच सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.श्री प्रकाशजी वैशंपायन साहेब,उपाध्यक्ष मा.श्री प्रभाकर कुलकर्णी ,सेक्रेटरी मा.श्री हेमंत बरकले ,शालेय समिती चेअरमन मा.श्री.रमेश महाशब्दे यांनी यशस्वी विद्यार्थिंनींचे व त्यांना मार्गदर्शन करणा-या शिक्षकांचे विशेष अभिनंदन केले.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सविता कुशारे ,अधिक्षिका सौ.मिना वाळूंजे , ज्युनि. काँलेजचे उपमुख्याध्यापक श्री. मिलिंद कोठावदे ,श्री परशराम पुंड व पर्यवेक्षक श्री.राजेंद्र सोमवंशी ,गव्हर्निग कौन्सिल सदस्य श्री.कैलास बागुल,सौ.भारती चंद्रात्रे ,सौ.संगीता चव्हाण शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी १० वी बोर्डाच्या परीक्षेमध्ये उत्तम यश संपादन केलेल्या विद्यार्थिनींचे अभिनंदन केले. सर्व यशस्वी विद्यार्थिंनींचे हार्दिक अभिनंदन..!
