
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९०६ वा दिवस* नकारात्मकतेचा थोडासा अंधार देखील सकारात्मकतेच्या ऊर्जेचा प्रकाश थांबवतो. सूर्य खूप मोठा, प्रखर, तेजोमय व ऊर्जामय आहे. मात्र एक छोटासा ढग देखील त्याचा आपल्या पर्यंतचा पोहचणारा प्रकाश रोखून धरू शकतो. त्यासाठीच आपल्याला नकारात्मक विचारांपासून सदैव दूर राहणे गरजेचे आहे. आपल्या मनातील सकारात्मक विचारच आपली शांतता आपले सुख आणि आपल्या आनंदाशी जोडलेले आहेत. मात्र केवळ सकारात्मक विचार करुन चालणार नाही तर त्याला सकारात्मक कृतीची आवश्यकता आहे. यातून नकारात्मकता दूर ठेवणे सोपे होईल.
स्वामी विवेकानंद…* *●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
*★ भारतीय सौर २४ वैशाख शके १९४७*★ वैशाख वद्य /कृष्ण २
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ बुधवार दि. १४ मे २०२५
★ १६५७ हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजीराजे भोसले यांचा जन्मदिन (पुरंदर किल्ल्यावर)
★ १९८४ फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग यांचा जन्मदिन.
*संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक*
