
सिन्नर ( प्रतिनिधी ) स्वराज्य रक्षक छञपती संभाजी राजे यांच्या ३६८वी जयंती महामित्र परिवार,सीटू ,आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने सिन्नर येथिल शिवाजी चौक येथे शंभुराजेंना अभिवादन करण्यात आले. छञपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास व संभाजी राजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष महामिञ दत्ता वायचळे म्हणाले की ,छञपती संभाजी महाराज हे शुरवीर धाडसी राजपुञ होते.त्यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण नावाचा संस्क्रुत ग्रंथ लिहीला.त्या ग्रंथामध्ये तरूणांना काही नियम सांगितले १) जुगार खेळू नये.२)खोटं बोलू नये.३)पर स्ञीचं व्यसन करू नये.४) मादक द्रव्याचं सेवन करू नये.५)असुरक्षित एकट्याने लांब लांब प्रवास करू नये.६)मनातील इंगित कोणाला सांगु नये.७)वाईट माणसांची संगत करू नये.हे सात राजशिष्टाचार सांगितले . *काॅम्रेड हरिभाऊ तांबे म्हणाले की काहिंनी शंभूराजांना व्यसनाधीन,स्ञीलंपट,वाईट असे रंगविले गेले.त्यांना बदनाम केले गेले.शंभूराजांना सतरा भाषा येत होत्या.छञपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले स्वराज्य बहुजनांना सोबत घेऊन शंभु राजांनी पुढे चालविले. विजय मुठे म्हणाले की* शिवरायांच्या म्रुत्यूनंतर अनेक सत्तांना वाटत होते की,स्वराज्य आता टिकणार नाही.परंतु शंभूराजांनी स्वराज्यातील एकही किल्ला दुस-यांच्या ताब्यात जाऊन दिला नाही. *राजेंद्र कोकाटे म्हणाले संभाजी महाराज यांनी आयुष्यात अनेक लढाया लढल्या परंतु एकही लढाई शंभुराजे हरलेले नाहीत भाऊसाहेब पवार म्हणाले*. काही केल्या स्वराज्याची सत्ता आपल्या हातात येत नाही म्हणुन अनेक जन त्यांचे शञू बनले.त्यामुळे काही स्वराज्य द्वेष्टींनी कपटाने संभाजी राजांना पकडून औरंगजेबाच्या हवाली केले व त्यांना हलाहल करून मारले आणि त्यांच्या शरीराचे तुकडे इंद्रायणी नदी मध्ये टाकण्यात आले.औरंगजेबाने फर्मान केले की,जो कोणी शंभूराजांना अग्निडाग देईल त्यांचे असेच हाल होतील. त्यामुळे कोणी अग्निडाग देण्यासाठी पुढे येत नव्हतं परंतु महार वाड्यातील गोविंद महार व साथीदार पुढे आले आणि त्यांनी शंभूराजांच्या शरीराचे तुकडे गोळाकरून ते शिवले व त्यांना महार वाड्यात अग्निडाग दिला.त्यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता राजांसाठी बलिदान दिले.अशा न्यायी,कुणाला शरण न जाणा-या शंभू राजास विनम्र अभिवादन!*सुञसंचलन विजय मुठे प्रास्ताविक हरिभाऊ तांबे आभार.भाऊसाहेब पवार* यावेळी महामित्र दत्ता वायचळे, काॅम्रेड हरिभाऊ तांबे, आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड चे सहसंस्थापक विजय मुठे, भाऊसाहेब पवार, राजेंद्र कोकाटे, प्रकाश माळी, नामदेव कुटे, राजेंद्र सातपुते, गणपत काळे, राजेंद्र पवार, राजेंद्र देशमुख,संजय धनगर, नितीन शिरसाठ, दत्तू नाठे,अमोल शेवाळे,शरद शिरसाठ,शंकर शिंदे, बाळासाहेब सांगळे, बबन डोकेफोड, किशोर शिरसाठ,मनोज माळी, बाळासाहेब नवसे, शिवाजी कानडी, धनंजय परदेशी आदी.उपस्थित होते.
