
नाशिक [ साहित्य सेवा ] उत्तर महाराष्ट्रातील बहुचर्चित प्रसिद्ध असलेले कवी लेखक गावगाडाकर सगर समाजाचे भूषण गोदाकाठचे खान्देशचे तात्या विविध राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित असलेले साहेबरावजी नंदन उर्फ तात्यासाहेब यांना वयाच्या बासष्टीत तिसऱ्यांदा जीवनगौरव पुरस्काराने नाशिक येथे सन्मानित करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजी नगर येथील काळीज माझं साहित्य या साहित्य संस्थेच्या नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या ८ जुन २०२५ रोजी राज्यस्तरीय काव्य समेलनात विविध जेष्ठ मान्यवरांच्या हस्ते साहेबराव तात्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे नुकतेच संस्थेचे निवडपत्र प्राप्त झाले आहे. या आधी त्यांना मुंबई येथील प्रजासत्ताक अमृत गौरव समिती व वसुनंदिनी फाऊंडेशन जळगाव यांचा जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे. या आधीही त्यांना अनेक मानाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. साहेबराव नंदन तात्या हे नाशिक जिल्ह्यातील ताहाराबादचे रहिवासी, उद्योग व्यवसाया निमित्त नाशिक येथे वास्तव्यास असुन, त्यांच्या नावावर गावगाडा काव्यसंग्रह, परिसस्पर्श कादंबरी / शिवाय सगर रत्न विशेषांक / सगर सेवार्थी अंक / नियमित सगर दिपोत्सव दिवाळी अंक / स्नेहबंध विशेषांक / अनेक कथा लघुकथा / अहिराणी रचना / इ. साहित्य प्रसिद्ध आहे. योग्य व्यक्ति योग्य निवड म्हणून साहित्य क्षेत्रात आनंद व्यक्त होत आहे.
