
वडांगळी( प्रतिनिधी ) मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय व अभिनव बाल विकास मंदिर या विद्यालयाचा एस. एस. सी. परीक्षेचा निकाल ९७.१४ टक्के इतका लागला आहे. इयत्ता दहावी सन २०२४/२५ या सालाकरता एकूण प्रविष्ट १७५ विद्यार्थी पैकी १७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत .पहिले प्रथम पाच क्रमांक पुढील प्रमाणे….१)प्रथम … खुळे तेजश्री दत्तात्रय.४६० गुण ९२.०० टक्के२) द्वितीय..खुळे प्रणाली बाळासाहेब ४५८गुण ९१.६०टक्के.३) तृतीय …भवर समीक्षा संजय ४५६ गुण ९१.२० टक्के ४) चतुर्थ…घुले हर्षदा तानाजी ४५५ गुण ९१.०० टक्के५) पाचवा.. चव्हाणके संचिता रामहरी४५१ गुण ९०.२० टक्के. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक बाळासाहेब खैरनार, पर्यवेक्षक मच्छिंद्र धातडक, सुभाषराव ठोक इयत्ता दहावीला शिकवणारे सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले आहे.या यशाबद्दल मविप्र समाज संस्थेचे अध्यक्ष सुनीलजी ढिकले, सरचिटणीस अॅड.नितीनजी ठाकरे साहेब,सिन्नर तालुका संचालक कृष्णाजी भगत साहेब, माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष सुदेश दादा खुळे, उच्च माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष आर.जे. थोरात सर, अभिनव बाल विकास मंदिर शालेय समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब चव्हाणके ,सरपंच नानासाहेब खुळे, युवा सभासद विक्रम माधवराव खुळे, विक्रम भास्कर खुळे सर्व शिक्षक ,संस्थेचे सर्व ज्येष्ठ सभासद पालक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.
