
नाशिक ( प्रतिनिधी )नाशिक दिनांक 12/05/2025वादळवांर्यासह झालेल्या अवकाळी पावसाने पंचवटीतील अनेक ठिकाणची वृक्षे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या असून उदय कॉलनी,मोरे मळा,येथे देखील झाडे पडल्याने काही काळ रस्ते बंद झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला,सदरील तक्रार समजताच *राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल चे जिल्हाध्यक्ष ॲड.सुरेश आव्हाड यांनी उद्यान विभागाच्या अती.आयुक्तांना फोन करून सदरील घटना कळविली, तसेच अग्निशमन विभागाचे लिडींग फायरमन संजय कानडे* यांना देखील पाचारण करण्यात आले.अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्वरित घटना स्थळी भेट देत स्थानिक नागरिकांच्या मदतीने सदरील झाडे बाजूला करून घेतली व झाडाखाली दबलेली वाहने बाजूला करून परिस्थिती नियंत्रणात आणली.यावेळी लीडिंग फायरमन संजय कानडे ,संदीप जाधव, धीरज पाटील, फायरमन बाळासाहेब लहांगे, वाहन चालक अशोक सरोदे, प्रकाश मोहिते, बाळासाहेब काकडे, आणि जेसीबी ऑपरेटर विलास जोपळ, अनुराग पवार,आशुतोष पगारे, प्रथमेश गवळे, नीलकंठ शिंदे, कार्तिक साठे, दिनेश चारोस्कर,मेहुल उगले, अजय पाटील आदी उपस्थित होते
