




पिंपळगाव बसवंत ( प्रतिनिधी )- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पिंपळगाव बसवंत येथील कर्मवीर गणपत दादा मोरे जनता विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी माध्यमिक शालांत परीक्षा मार्च २०२५ मध्ये आपल्या उज्वल यशाची परंपरा ही कायम राखली आहे. माध्यमिक शालांत परीक्षा मार्च २०२५ चा निकाल हा नुकताच जाहीर झाला आहे. त्यात जनता विद्यालयाचा निकाल 95.68% लागला आहे. जनता विद्यालयात माध्यमिक शालांत परीक्षेसाठी एकूण विद्यार्थी 139 प्रविष्ट झालेले होते. त्यापैकी 133 विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले आहे.निकालाची काही ठळक वैशिष्ट्ये– एकूण प्रविष्ट विद्यार्थी – 139 पास विद्यार्थी – 133 विद्यालयाचा शेकडा निकाल – 95.68% विशेष प्राविण्यात उत्तीर्ण विद्यार्थी- 26 प्रथम श्रेणी मध्ये उत्तीर्ण विद्यार्थी – 57 द्वितीय श्रेणी मध्ये उत्तीर्ण विद्यार्थी- 42 पास ग्रेड मध्ये उत्तीर्ण विद्यार्थी – 08विद्यालयातील प्रथम पाच क्रमांक1)कु. शिंदे श्रद्धा संजय (94.20)2)कु. बैरागी गार्गी गोविंद (87.20)3)कु. आहेर अक्षदा विष्णू (86.60)4)कु. पानपाटील दीक्षा सतीश (86.00)5)कु. शिंदे स्वीटी प्रदीप (85.00) सदर सर्व विद्यार्थ्यांचे मविप्र समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे साहेब,अध्यक्ष डाॅ.सुनील ढिकले साहेब ,उपाध्यक्ष विश्वासराव मोरे साहेब, सभापती बाळासाहेब क्षीरसागर साहेब ,उपसभापती देवराम मोगल साहेब,चिटणीस दिलीप दळवी साहेब,निफाड तालुका संचालक श्री शिवाजी गडाख, महिला सदस्या श्रीम शोभाताई बोरस्ते व सर्व संचालक मंडळ,मविप्र समाज संस्थेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रा.डाॅ.भास्कर ढोके,शालेय समितीचे श्री जयराम मोरे व सर्व सदस्य,पालक – शिक्षक संघाचे श्री साहेबराव आथरे व सर्व सदस्य,विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय डेर्ले, सर्व शिक्षक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. फोटो – पिंपळगाव बसवंत येथील कर्मवीर गणपत दादा मोरे जनता विद्यालयाचे अनुक्रमे पाच विदयार्थी
