
*मखमलाबाद ( वार्ताहर ) — मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मखमलाबाद येथील एस.एस.सी.परीक्षेचा निकाल ९७.००% लागला.या परीक्षेसाठी विद्यालयातील एकुण ५३१ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते,त्यापैकी ५१५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.१८६ विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले असुन प्रथम पाच क्रमांक पुढील प्रमाणे**१} कु.साई गजानन पवार = ९५.००%**२} कु.प्रथमेश बालाजी मुंडे = ९४.२०%**३} कु.रोशनी सोमनाथ महाले = ९४.००%**४} कु.प्रेम भाऊसाहेब गवळी = ९३.६०%**५} कु.अथर्व रविकांत झाल्टे = ९३.४०%* *इ.१० वीच्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य संजय डेर्ले,उपप्राचार्या विमल रायते,पर्यवेक्षक सुनिल पाटील,इ.१० वीचे वर्गशिक्षक,विषयशिक्षक,सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले.या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मविप्रचे सरचिटणीस अॅड.नितीन ठाकरे,अध्यक्ष डॉ.सुनील ढिकले,उपाध्यक्ष विश्वास मोरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर,उपसभापती देवराम मोगल,चिटणीस दिलीप दळवी सर्व संचालक मंडळ तसेच मविप्र संचालक रमेश आबा पिंगळे,माजी सेवक संचालक डाॅ.अशोकराव पिंगळे,शिक्षणाधिकारी डाॅ.भास्करराव ढोके,उच्च माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष पंडितराव पिंगळे,अभिनव शालेय समितीचे अध्यक्ष निवृत्ती महाले,कला व वाणिज्य महाविद्यालय समितीचे अध्यक्ष सुरेश पिंगळे,होरायझन शालेय समितीचे अध्यक्ष शंकरराव पिंगळे,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष पहिलवान वाळू काकड सर्व समित्यांचे सदस्य,सभासद, ग्रामस्थ,प्राचार्य संजय डेर्ले,उपप्राचार्या विमल रायते,पर्यवेक्षक सुनिल पाटील,सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
