


नांदगाव (प्रतिनिधी ) CBSE बोर्ड परीक्षेत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश……दि.13 मे 2025 नादंगाव येथील, जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल मंगळवार दि. 13 मे रोजी जाहीर झाला.या परीक्षेत विद्यार्थ्यांनी उत्तुंग अशी भरारी मारली.या परीक्षेस 32 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते.100%निकालाची परंपरा याही वर्षी विद्यार्थ्यांनी कायम ठेवली .त्या पैकी रसिका मेडतिया या विद्यार्थ्यांनी 90%गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला तर श्रावणी गायकवाड या विद्यार्थिनींने 89%गुण मिळवून द्वितीय व क्रांती इंगोले हिने 86% गुण मिळवून तृतीय तर गुण कवडे 83%गुण मिळवून चतुर्थ तर कु. मयुरी चव्हाण, सार्थक मताडे, वैष्णवी पाटील व प्रगती पगार ह्या विद्यार्थ्यांनी 81% गुण मिळवून पाचवा क्रमांक पटकवला तसेच श्रावणी गायकवाड, गुण कवडे, आणि क्रांती इंगोले या विद्यार्थिनींनी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी(IT) या विषयांमध्ये 100 पैकी 100 गुण मिळवत उत्तुंग निकालाची परंपरा कायम ठेवत विद्यालयास वैभव प्राप्त करून दिले.या विद्यार्थ्यांच्या यशस्वीतेसाठी वर्गशिक्षक प्राचार्य श्री मणी चावला, मोहिनी देसले, विषय शिक्षक सुदर्शन चोळके,प्रियंका राजपूत, सुषमा काळे,रिटा उबाळे, दत्तात्रय पवार,पल्लवी राओंदरे, निलेश पाटील ,वैशाली सोनवणे,अशोक बागूल, भगवान नाईकवाडे, वासुदेव आहेर, गिरीश पांडे, रिजवान मन्सूरी यांनी खूप परीश्रम घेतले.या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन मा श्री. सुनिलकुमारजी कासलीवाल तसेच संस्थेचे सेक्रेटरी विजय चोपडा, सहसचिव प्रमिलाताई कासलीवाल सुशिलकुमार कासलीवाल, जुगलकिशोरजी अग्रवाल रिखबचंद कासलीवाल ,महेंद्रभाऊ चांदीवाल प्रशासक अधिकारी प्रकाश गुप्ता ,मुख्याध्यापक शरद पवार, गोरख डफाळ,विशाल सावंत यांनी विद्यालयाच्या सर्व घटकांच्या वतीने अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
