
नांदगाव ( प्रतिनिधी )विजय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, कै. पुंडलिक पांडुरंग मवाळ विद्यालय पिंपरखेड, ता. नांदगाव जि. नाशिक* या विद्यालयाने यशस्वीता व गुणवत्तेची परंपरा कायम राखली असून फेब्रुवारी /मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस. एस. सी ) बोर्डाच्या परीक्षेचा निकाल ९६.२२%लागला असून परीक्षेस एकूण ५३ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी ५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पहिले पाच विद्यार्थी खालील प्रमाणे आहेत. *1)कु. मवाळ प्रतिक्षा अशोक ८७.२०%**2) कु.गरूड समृद्धी उद्धवराव ८५%**3) कु. गरूड धनश्री योगेश ८४.८०%**4) कु. घाडगे अनुजा रवींद्र ८४%* *5) कुमार. चव्हाण ऋषिकेश बबन ८३.२०* परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे सरचिटणीस मा. वसंतराव बापू मवाळ, मुख्याध्यापक मा. काशिनाथ गवळी, मा. संदीपभाऊ मवाळ तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सन्मा.सदस्य, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
