




*नांदगाव( 13 मे ) . नांदगाव येथील श्री.माणिकचंद जगन्नाथ कासलीवाल एज्यू.संस्थेच्या सौ. कमलाबाई माणिकचंद कासलीवाल विद्यालयाचा एस .एस. सी परीक्षा 2025 चा 100% निकाल…* सौ. कमलाबाई माणिकचंद कासलीवाल विद्यालयातील कु. वाबळे पूनम संदीप ९३.६० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर कु. खैरनार ओम वाल्मीक ९२. ६० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला तर तृतीय क्रमांक कु. क्षीरसागर ओमकार किशोर ९१.८० टक्के गुण प्राप्त केले. तसेच कु. राऊत प्रेरणा गणेश ९१.२० टक्के गुण मिळवून चतुर्थ तर कु. शिंदे संस्कार सागर ९१.०० टक्के गुण मिळवून पाचवा क्रमांक प्राप्त केला. यावर्षी परीक्षेस १११ विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे, मुख्याध्यापक यांचे संस्थेचे चेअरमन श्री.सुनीलकुमार कासलीवाल, सचिव श्री विजयकुमार चोपडा, सहसचिव सौ. प्रमिलाताई कासलीवाल, श्री. रिकबकाका कासलीवाल, सुशिलभाऊ कासलीवाल, जुगलकिशोर अग्रवाल, महेंद्रभाऊ चांदीवाल, मार्गदर्शक श्री गुप्ता सर प्राचार्य मनी चावला , मुख्याध्यापक (माध्य.) श्री. शरद पवार ,गोरख डफाळ, मुख्याध्यापक (प्राथ) विशाल सावंत तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
