
नाशिक (प्रतिनिधी) नाशिक जिल्ह्यात कार्यरत असलेल्या सर्व मानसोपचार तज्ज्ञांची ( सायकियाट्रिस्ट डॉक्टर) संघटना असलेल्या नाशिक सायकियाट्रिक सोसायटी (NPS) चा पदग्रहण सोहळा दिनांक १० मे रोजी केन्सिंग्टन क्लब येथे संपन्न झाला. ह्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील प्रथितयश जेष्ठ मानसोपचार तज्ज्ञ, इंडियन सायकिट्रिक सोसायटीचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ विद्याधर वाटवे त्याच बरोबर विशेष अतिथी म्हणून नाशिक आयएमएचे माजी अध्यक्ष व एसोसिएशन ऑफ फिजिशियनचे विद्यमान अध्यक्ष डॉ समीर चंद्रात्रे ह्यांची उपस्थिती होती. नूतन कार्यकारिणी पुढील प्रमाणे- अध्यक्ष- डॉ जयंत ढाके, उपाध्यक्ष- डॉ उमेश नागापूरकर, सचिव- डॉ महेश भिरुड, खजिनदार- डॉ हेमंत सोननीस, कार्यकारणी सदस्य- डॉ आनंद पाटील, डॉ विलास चकोर, डॉ निलेश जेजुरकर, डॉ मानस सुळे, डॉ अनुप भारती, डॉ स्वाती वंजारी ह्यांनी पदभार स्वीकारला. सदर कार्यक्रमात बोलताना डॉ वाटवे ह्यांनी मानसोपचार तज्ज्ञ संघटनेची उद्दिष्टे समजावून सांगितली व त्याच बरोबर काही किचकट व जोखीमीच्या क्लिनिकल केसेस बद्दल विशेष मार्गदर्शन केले. डॉ समीर चंद्रात्रे ह्यांनी सध्याच्या युवा पिढीतील मानसिक बदल व वाढत असलेली व्यसनाधीनता, बाल गुन्हेगारी ह्यावर चिंता व्यक्त केली व नाशिक मधील सायकियाट्रिस्टना ह्या विषयावर खोलात जाऊन एकत्र असे सामाजिक काम करायला हवे असे आवाहन केले. नूतन अध्यक्ष डॉ जयंत ढाके ह्यांनी त्यांच्या एक वर्षाच्या कालावधीत नियोजित कार्यक्रमांची रूपरेषा मांडली व अधिकाधिक मानसिक आरोग्य बद्दल जनजागृती करण्यासाठी त्याच बरोबर मानसोपचार तज्ञांच्या समस्या सोडवणाच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. माजी अध्यक्ष्य डॉ बीएसवी प्रसाद व माजी सचिव डॉ नागापूरकर ह्यांनी गेल्या २५ वर्षातील नाशिक सायकियाट्रिक सोसायटीचा कार्यकाळ, राबविलेल्या अनेक उपक्रमांची, दैदीप्यमान कामगिरीची माहिती दिली व ३-४ सदस्य असलेली ही संघटना कशी हळूहळू सद्य परिस्थितीत जवळपास २८ सदस्य असलेल्या मोठ्या कुटुंबाप्रमाणे काम करत आहे ह्याबद्दल समाधान व्यक्त केले. ह्या कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ निलेश जेजुरकर ह्यांनी उत्कृष्ट पणे केले. खजिनदार डॉ हेमंत सोननीस ह्यांनी आभार प्रदर्शन केले व संघटना अधिक बळकट करण्याची ग्वाही दिली. कार्यक्रम आयोजित करण्यासाठी डॉ अनुप भारती, डॉ स्वाती वंजारी, डॉ नकुल वंजारी ह्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास नाशिक सायकियाट्रिक सोसायटीचे सर्व मान्यवर सदस्य व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते, त्याच बरोबर जेष्ठ सदस्य व मार्गदर्शक डॉ शिरीष सुळे सर, जेष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ विजया सुळे, जेष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ श्री व सौ डॉ बापये, नाशिक आयएमएच्या सचिव डॉ मनीषा जगताप ह्यांची विशेष उपस्थिती होती.
