
लोहोणेर-:( प्रतिनिधी )महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने फेब्रुवारी/मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी परीक्षेत जनता विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले. नुकताच मंडळाच्या वतीने अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. विद्यालयाचा एकूण निकाल ९५.२१टक्के इतका लागला असून परीक्षेसाठी २०९ नियमित विद्यार्थी प्रविष्ट होते. त्यात १९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष श्रेणीत ११० विद्यार्थी प्रथम श्रेणीत ६३ विद्यार्थी,द्वितीय श्रेणीत २४तर पास श्रेणीत २उत्तीर्ण. सदर निकाल हा बेस्ट ऑफ फाईव्ह नुसार असून विद्यालयातील प्रथम पाच विद्यार्थी पुढील प्रमाणे प्रथम-वृषाल दिनेश पगार ४५९ गुण एकूण ५०० पैकी शेकडा गुण ९१.८०टक्के द्वितीय- साई रविंद्र आहिरे ४५८ गुण शेकडा गुण ९१.६०टक्के तृतीय-यश नामदेव गांगुर्डे ४५७ गुण शेकडा गुण ९१.४०टक्के चतुर्थ-लोकेश निलेश भावसार एकूण गुण ४५६ शेकडा गुण ९१.२० टक्के,पाचवा- कपिल किरण जाधव एकूण गुण ४५२ शेकडा गुण ९०.४० टक्के मिळाले.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मविप्र देवळा तालुका संचालक विजय पगार, माध्यमिक शालेय समिती भैय्यासाहेब देशमुख,उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष नितीन आहेर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिपक देशमुख, शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष मयुर सुराणा, माता पालक संघ उपाध्यक्षा रुपाली धामणे,सर्व सदस्य शालेय समिती,व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ,मातापालक संघ आदींसह मुख्याध्यापिका एस.यू.सागर व पर्यवेक्षक आर.एच.देसले आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.यशस्वी विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीला अध्यापन करण्याऱ्या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
