


कसबे सुकेणे (प्रतिनिधी) ता 13- मविप्र संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात माध्यमिक विद्यालय मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयात चालू वर्षी देखील मुलींनीच बाजी मारली असून पहिल्या पाच विद्यार्थ्यांपैकी चार मुली उत्तीर्ण झाल्या असून प्रथम क्रमांकाने गौरी अशोक तिडके 91.80% गुण मिळवत उत्तीर्ण झाली द्वितीय प्रतीक्षा विठ्ठल पवार 88.60%, तृतीय स्नेहल शहाजी भोसीकर 88.40%,चतुर्थ आयुष किशोर हांडोरे 88.00%, पाचवा मिस्बाहनाज जाकीर शेख 86.40% गुण मिळवत उत्तीर्ण झाली विद्यालयातील 195 विद्यार्थ्यांपैकी विशेष श्रेणीत 32, प्रथम श्रेणीत 52, द्वितीय श्रेणीत 61 विद्यार्थी पास झाले विद्यालयाचा एकूण निकाल 87.17% लागला यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सरचिटणीस ॲड नितीनभाऊ ठाकरे, अध्यक्ष डॉ सुनील ढिकले,उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, सभापती बाळासाहेब शिरसागर,उपसभापती डी बी अण्णा मोगल,संचालक शिवाजी आप्पा गडाख, संचालिका सौ शोभाताई बोरस्ते, स्कूल कमिटीचे अध्यक्ष अतुल भंडारे व मोतीराम जाधव,प्राचार्य रायभान दवंगे, उपमुख्याध्यापक अनिल परदेशी, पर्यवेक्षक राजेश खताळ, सर्व सेवक व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले
पालकांना शेतीत मदत करत गौरीचे निर्मळ यश – शेतात आई वडिलांना मदत करत उरलेल्या वेळेत चार ते पाच तास कायमस्वरूपी अभ्यास करत व परीक्षेच्या काळात आठ ते दहा तास नियमित अभ्यास करून प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करत हे यश तिने मिळवले तिच्या यशामुळे कुटुंबासह शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण असून तिच्या उज्वल भविष्यासाठी तिला खूप खूप शुभेच्छा
