
सिन्नर( प्रतिनिधी):- सिन्नर तालुक्यातील डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल ९८ .५९ टक्के इतका लागला असून विद्यालयाने उज्वल यशाची परंपरा या वर्षीही कायम राखल्याने सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मार्च -२०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये विद्यालयातील शिवम रविंद्र शिंदे (९२ ) प्रथम, श्रावणी योगेश वारुंगसे (९१.४०) द्वितीय ,लावण्या धनंजय वाजे (९१.२०) तृतीय, आदित्य ज्ञानेश्वर सांगळे (८८.६०) चतुर्थ,, विद्या संदीप निमसे (८६.६०) व पार्थ दिलीप वामने (८६.६० ) यांनी पाचवा क्रमांक मिळवत यश संपादन केले. विद्यालयातील १४२ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते .त्यापैकी १४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ५४ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य तर ६१ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळविली.२२ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. यशस्वी विद्यार्थ्यांना डी.एच.जाधव, पी.आर.करपे,सोमनाथ पगार,सोमनाथ गिरी, राजेंद्र गांगुर्डे, सीमा गोसावी,मारुती डगळे, डी. ए. रबडे,रेवणनाथ कांगणे,सोमनाथ बोडके ,उत्तम कामडी आदींचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस अँडव्होकेट नितीन ठाकरे, तालुका संचालक कृष्णाजी भगत , संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉ.भास्करराव ढोके,जेष्ठ नेते प्रकाशभाऊ वाजे, शालेय समितीचे अध्यक्ष नारायण वाजे ,उच्च माध्यमिक समितीचे अध्यक्ष विठ्ठल वामने, पालक- शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सोमनाथ वारुंगसे,प्राचार्य रंगनाथ उगले ,पर्यवेक्षक उल्हास पवार, माजी प्रभारी मुख्याध्यापक रामदास वाजे आदींसह शालेय समितीचे सदस्य, पालक शिक्षक संघ सदस्य, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
