
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९०५ वा दिवस सत्याचे अधिष्ठान नसलेली मतप्रणाली माणसाचे मन दुबळे करते. माणसाला खुळचट बनविते. माणसात विषाद भरते. माणसाला भलत्यासलत्या अशक्यप्राय गोष्टींच्या मागे धावायला शिकवते, चमत्कारांच्या नादी लावते. यातून अंधविश्वास वाढीस लागतो. अशी मतप्रणाली मला मुळीच पसंत नाही. कारण, तिचा परिणाम हा व्यक्तीसाठी व राष्ट्रासाठी घातक ठरू शकतो. तिच्यामुळे आपले मन रोगट, विकृत, दुबळे, कमकुवत होते. इतके की, कालांतराने आपण सत्याच्या आकलनास आणि जीवनात ते सत्य आचरणास जवळजवळ पूर्णपणे अपात्र होऊन जातो. स्वामी विवेकानंद… ●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर २३ वैशाख शके १९४७
★ वैशाख वद्य /कृष्ण १
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ मंगळवार दि. १३ मे २०२५
★ नारद जयंती
★ १६४८ दिल्लीच्या लाल किल्ल्याचे काम पूर्ण झाले.
★ २००१ सुप्रसिध्द इंग्लिश साहित्यिक, गाईड, मालगुडीका आदमखोरचे लेखक पद्मविभूषण रासीपूरम कृष्णस्वामी अय्यर नारायणस्वामी ऊर्फ आर. के. नारायण यांचा स्मृतीदिन.
★ २०१६ संत निरंकारी हरदेव सिंहजी महाराज यांचा स्मृतीदिन.
