
मनमाड, (प्रतिनिधी ) १२ मे – मागील काही दिवसांपासून वाढलेल्या प्रचंड उकाड्यामुळे हैराण झालेल्या मनमाडकरांना आज अखेर दिलासा मिळाला. शहरात दुपारनंतर अचानक आकाशात काळे ढग दाटून आले आणि दुपारी जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली.या पावसामुळे उष्म्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शहरात गेल्या आठवड्यापासून मधून मधून पावसाच्या सरी बरसत आहे

आज सकाळ पासून वातावरणात उघडा जाणवत होता उष्णतेमुळे लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वच त्रस्त होते. विशेषतः दुपारच्या वेळेस रस्त्यांवर शुकशुकाट जाणवत होता.आजच्या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडांची पाने, फांद्या उडाल्या, तसेच काही भागात तात्पुरती वीज खंडित करण्यात आली होती.तरीही, या पावसामुळे शहरात थोडा गारवा निर्माण झाला असून, नागरिकांनीही आनंद व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर अनेकांनी पावसाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आनंद व्यक्त केला. बेमोसमी पावसामुळे कांद्याचे बी डोंगळे पिक नुकसान होणार आहे उन्हाळ कांदा खराब होण्याची शक्यता वर्तवली जात आहेपावसाचे आगमन ही शेतीसाठीही एक सकारात्मक सुरुवात मानली जात आहे. जरी हा पाऊस पूर्वमोसमी असला तरी यामुळे शेतकऱ्यांमध्ये आशा पल्लवीत झाली आहे की लवकरच मान्सूनचं आगमन होईल.प्रशासनाने वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक पावले उचलली असून, नागरिकांनी काळजीपूर्वक राहण्याचे आवाहन केले आहे तसेचआशी सविस्तर माहिती श्री भागवत झालटे यांनी दिली
