
कराड( प्रतिनिधी) ३१वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन कराड येथील यशवंतराव चव्हाण रंगमंदिरात मोठ्या उत्साहात संपन्न. झाले महाराष्ट्रातील प्रत्येक भाषिक शाळेत शिवकालीन इतिहास शिकवायला हवा. नवीन पिढीला मराठीपण जगायला शिकवले पाहिजे. घराघरांतून जिजाऊचे संस्कार रुजायला हवेत, वाचन प्रतिभा पुन्हा नव्याने वाढायला हवी. असे मनोगत कवी संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. राजश्री बोहरा यांनी व्यक्त केले.अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद तर्फे ३१वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन दिनांक ९ आणि १० मे रोजी कराड येथील यशवंतराव चव्हाण साहित्य नगरीत संपन्न झाले. याप्रंगी कवी संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. राजश्री बोहरा यांनी उपस्थितांना संबोधित करून नवीन विचारांची पेरण केली आहे. या प्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांच्या नेतृत्वाखाली या संमेलनाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी कृषीमंत्री श्री लक्ष्मणराव ढोबळे, लोकशाही न्यूज चॅनलचे संपादक श्री विशाल पाटील व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील एकूण ६५० पेक्षा जास्त कवी साहित्यिकांनी या साहित्य संमेलनात सहभाग नोंदवला.
