
नांदगाव (प्रतिनिधी ) विश्वशांती बुद्ध विहार कैलास नगर येथे वैशाख पौर्णिमेनिमित्त माननीय अंजुमताई कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना महिला आघाडीच्या वतीने खीरदानाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

बुद्ध वंदने नंतर उपस्थित महिलांना खीर देऊन वैशाखी पौर्णिमा साजरी करण्यात आली याप्रसंगी कैलास नगर येथील सर्व ज्येष्ठ आणि परिसरातील महिला उपस्थित होत्या. याप्रसंगी शिवसेना महिला आघाडीच्या नेहा ताई कोळगे वंदना पांडे आशाताई पाटील जयश्री डोळे संगीता साळवे साबळे ताई लता मोरे मधुमती वाघ डांगरे ताई संगीता साळवे कल्पना सुरवाडे जया ताई जगताप विद्या कसबे विना पांडे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते
