
मुंबई (प्रतिनिधी )क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आलीय. भारतीय संघातील क्रिकेटपटू विराट कोहली याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट करत त्याने हा निर्णय जाहीर केला आहे. गेल्या आठवड्यातच विराटने निवृत्तीचे संकेत दिले होते, BCCIशी त्याचं बोलणंही झालं होतं. मात्र अखेर आज या निर्णयावर त्याने शिक्कामोर्तब करत हा निर्णय जाहीर केला आहे. रोहित शर्मापाठोपाठ विराटनेही कसोटी क्रिकेटला अलविदा केल्याने क्रिकेट प्रेमी दुखी झालेत.काही दिवसांपूर्वीच विराटने कसोटी क्रिकेटच्या निवृत्तीबाबत संकेत दिले होते. आज या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याने त्याचे चाहते आता त्याला पुन्हा कधीच कसोटीच्या फॉरमॅटमध्ये खेळताना पाहू शकणार नाहीत. 14 वर्षांच्या टेस्ट क्रिकेटच्या कारकिर्दीला अखेर जड अंत:करणाने अलविदा करत असल्याचे सांगत विराटने सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे.विराटने इन्स्टावरील पोस्टमध्ये बऱ्याच गोष्टी नमूद केल्या. कसोटी क्रिकेटमधील हा प्रवास मी हसतमुखाने पाहीन असं त्याने लिहीलं असलं तरी आयुष्यातील एक स्वप्न अधुरं राहिल्याचं दु:ख कायम त्याच्या मनात सलत राहील. विराटचं ते स्वप्न कसोटीतील 10 हजार धावांशी निगडीत आहे. ते पूर्ण न करताच त्याने कसोटी क्रिकेटच्या या फॉरमॅटला अलविदा केलंय. विराटचं टेस्ट करिअरविराट कोहलीने त्याच्या 14 वर्षांच्या कारकिर्दीत 123 कसोटी सामने खेळले, ज्यामध्ये त्याने 210 डावांमध्ये 46.85 च्या सरासरीने 9230 धावा केल्या. पण विराट त्याच्या 10 हजार कसोटी धावांच्या स्वप्नापासून अवघा 770 धावा दूर होता. विराट कोहलीची कसोटी शतकं आणि अर्धशतकांची संख्या जवळजवळ समान आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 30 शतकं आणि 31 अर्धशतकं झळकावली आहेत. विराटचं एकूण क्रिकेट करिअर123 टेस्ट, 210 इनिंग्स, 9230 रन, 46.85 ॲव्हरजे, 30 शतक, 31 अर्धशतक 302 वनडे, 290 इनिंग्स, 14181 रन, 57.88 ॲव्हरेज, 51 शतक, 74 अर्धशतक, 5 विकेट 125 टी20, 117 इनिंग्स, 4188 रन, 48.69 ॲव्हरेज, 1 शतक, 38 अर्धशतक, 4 विकेट
