
मंचर ( प्रतिनिधी) आंबेगाव मंचर- पुणे -सोलापूर मार्गे अक्कलकोट ही एसटी बस रविवार दिनांक ११ मे रोजी सकाळी नऊ वाजता चालू झाली असून सायंकाळी पाच वाजता अक्कलकोट मुक्कामी राहून अक्कलकोट येथून सकाळी सात वाजता सुटून सायंकाळी पाच वाजता मंचरला पोहोचणार आहे. ही एसटी बस नियमित चालू राहणार आहे या मंचर अक्कलकोट एसटी बसचे उद्घाटन संतोष वळसे पाटील, प्रताप हिंगे पाटील, मंचर एसटी आगर प्रमुख बालाजी सूर्यवंशी, वाहतूक नियंत्रक सलीम सय्यद, वैभव बाणखेले, उद्योजक विनायक भोर यांच्या हस्ते संपन्न झाले. राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या सूचनेवरून मंचर – अक्कलकोट एसटी बस चालू झाली असुन स्वामी समर्थ भाविक भक्तांची सोय झाली असून स्वामी भक्तांनी वळसे पाटील यांचे आभार मानले आहेत.
