
.नाशिक (बातमीदार) दिनांक १२- संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेसाठी काम करणारी कुसुमाग्रज मराठी विचार मंच ही संस्था मराठी भाषेविषयी बालपणापासूनच आवड निर्माण व्हावी आणि सोशल मिडियाच्या विविध साधनांमुळे वाचनाची गोडी कमी होत असल्याने वाचन संस्कृती वाढावी म्हणून खास तयार केलेल्या पुस्तकाच्या अभ्यासाद्वारे शालेय विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेत आहे. या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मराठीचे उपासक ही पदवी देऊन सन्मानित करण्यात येते, असे मराठीचे उपासक तयार करण्याचे काम संस्था करीत असून गेल्या पाच महिन्यापासून जवळपास अकरा हजार विद्यार्थ्यांना मराठीचे उपासक ही पदवी मंचाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. येत्या शैक्षणिक वर्षांमध्ये सुमारे तीन लाख मराठीचे उपासक तयार करण्याचे काम केले जाणार आहे. या संस्थेच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये संस्थेचे अध्यक्ष म्हणून संस्थापक श्री सतीश बोरा यांची निवड करण्यात आलेली असून सरचिटणीसपदी सुभाष सबनीस यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. या संस्थेची नूतन कार्यकारिणी पुढील प्रमाणे अध्यक्ष-सतीश बोरा, उपाध्यक्ष-दिलीप बारवकर आणि आनंद देशपांडे, सरचिटणीस-सुभाष सबनीस, खजिनदार-जयप्रकाश मुथा, कार्यकारीणी सदस्य श्रीमती सुहासिनी वाघमारे, शिरीष देशपांडे, नंदकिशोर ठोंबरे, प्रकाश शिंपी, अभय ब्रम्हेचा, सौ.सुमती पवार.या नूतन कार्यकारिणीने मराठी भाषा विषयक नवनवीन उपक्रम राबविण्याचे ठरविले असून सर्व नाशिककरांना या संस्थेच्या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष सतीश बोरा यांनी केले आहे.
