
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९०४ वा दिवस गौतम बुद्ध कर्मयोगाचे आदर्श आहेत. त्यांनी संपूर्ण निष्कामतेने कार्य केले. हृदय आणि बुद्धी यांचा श्रेष्ठ संगम असलेले आणि अपूर्व आत्मिकशक्तीने दीप्तिमान झालेले असे व्यक्तिमत्व मानवतेच्या इतिहासात दुसरे कोणते आहे ? बुद्धांएवढा बुद्धिमान, प्रगल्भ, परिपूर्ण माणूस जगाने आजवर पाहिलेला नाही. बुद्धांच्या सामर्थ्याचा एक थेंब माझ्याकडे असता, तरी माझ्या हातून खूप मोठे कार्य झाले असते ! एवढा थोर तत्त्वचिंतक कोणी आजवर बघितला नाही. असा शिक्षक यापूर्वी कधी होऊन गेला नाही. काय सामर्थ्य होते पाहा. जुलमी सत्तेसमोरही हा माणूस कधी वाकला नाही. सक्षमपणे उभा राहिला. सतत तेवत राहिला.
स्वामी विवेकानंद..
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर २२ वैशाख शके १९४७
★ वैशाख पौर्णिमा
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ सोमवार दि. १२ मे २०२५
★ बुध्द पौर्णिमा
★ १६६६ आग्रा येथे दरबारात छत्रपती शिवाजी महाराज व औरंगजेबाची पहिली व अखेरची भेट झाली.
★ १९५२ भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर पहिल्या संसदीय अधिवेशनास प्रारंभ.
★ २०१२ नाशिक जिल्हा अहिल्यादेवी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र स्वर्गीय रोडूआण्णा पाटील यांचा १३ वा स्मृतीदिन.
★ जागतिक परिचारिका दिन.
★ अखंड विश्वाला प्रज्ञा शील करुणा, दया, क्षमा शांती व अहिंसेचा पुरस्कार करुन विश्वशांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुध्द यांना जयंतीदिनी त्रिवार वंदन…
